Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress MLA| अखेर नजिर खान यांचे ते भाकीत खरे ठरले! काँग्रेसच्या आठ आमदार भाजपच्या वाटेवर

येणाऱ्या दोन महीन्यात विद्यमान काँग्रेसचे आठ आमदार दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक खुलासा नजिर खान यांनी केला होता.

दैनिक गोमन्तक

वास्को: वास्को बायणा येथील एका पत्रकार परिषदेत नजिर खान यांनी या फुटीसंदर्भात एक मोठं वक्तव्य काही दिवसांपूर्वीच केलं होतं. यावेळी येणाऱ्या दोन महिन्यात विद्यमान काँग्रेसचे आठ आमदार दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा नजिर खान यांनी केला होता.

(nazir khan prediction may come true as 8 congress mla gathered in goa assembly to join bjp)

काँग्रेसला गोव्यात मोठं खिंडार; 8 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असुन, काँग्रेस पक्षाचे 8 आमदार गोवा विधानसभेत पोहोचले असून. ते आताच भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या चर्चांना उधाण आलेले आहे. निवडणूक झाल्यापासून काँग्रेसचे आमदार दुसऱ्यांदा भाजपच्या वाटेवर जात आहेत. सर्व धर्म पाळणारा गोवा प्रदेश काँग्रेस समितीवरील जनतेचा विश्वास गेल्याने काँग्रेस पक्ष रसातळाला पोहचला असल्याची माहीती गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे माजी अध्यक्ष नजिर खान यांनी दिली होती.

खळबळजनक खुलासा नजिर खान यांनी केला होता

वास्को बायणा येथील आपल्या कार्यालयात माहीती अध्यक्ष नजिर खान यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. यावेळी येणाऱ्या दोन महीन्यात विद्यमान काँग्रेसचे आठ आमदार दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक खुलासा नजिर खान यांनी केला होता. त्यांच्या समवेत अल्पसंख्याक विभागाचे साजिद खान,एलविनो अरावजो,बर्नाद फर्नाडीस उपस्थित होते.

राज्य काँग्रेस पक्षाने गोव्यातील अल्पसंख्याकांचा उपयोग फक्त विधानसभा निवडणुकीपुरता करून आमच्यावर अन्याय केला आहे. अशा स्वार्थी पक्षावर यापुढे विश्वास ठेवणे कठीण असल्याने गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदाबरोबर काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती नजिर खान यांनी दिली होती. ते पुढे म्हणाले, गोवा प्रदेश काँग्रेस समितीवरील जनतेचा विश्वास गेल्याने काँग्रेस पक्ष रसातळाला पोहचला आहे.

गोवा प्रदेश काँग्रेस समितीने येथील जनतेचा विश्वास गमावला; नजिर खान

पुढे माहीती देताना नजिर खान म्हणाले कि, गोवा प्रदेश काँग्रेस समितीने येथील जनतेचा विश्वास गमावला असून असल्या स्वार्थी पक्षावर यापुढे साथ देणे कठीण असल्याने गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्ली अखिल भारतीय कॉंग्रेस अल्पसंख्याक कार्यालयात तर काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा पणजी येथील काँग्रेसच्या कार्यालयात देण्यात आल्याची माहीती नजिर खान यांनी दिली आहे.

गोवा प्रदेश काँग्रेस जबाबदार

राज्यातील जनतेने अकरा काँग्रेसचे आमदार निवडून दिले असताना सुध्दा पक्षातील आठ आमदार स्वार्थापोटी दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा खुलासा देखिल खान त्यांनी पत्रकार परिषदेत केला. यामुळे भविष्यात काँग्रेस पक्ष रसातळाला पोहचणार आहे. याला पुर्णपणे गोवा प्रदेश काँग्रेस जबाबदार असणार तसेच अध्यक्ष अमित पाटकर, माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर व इतर नेते. गोव्यातील काँग्रेस पक्षाच्या नेत्याने आपल्या स्वार्थासाठी, या पक्षाचा फक्त आर्थिकरित्या उपयोग केला असल्याने केंद्रीय पदाधिकाऱ्यानी येथील पक्षावर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी नजिर खान यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT