चिखली दाबोळी सर्कल दैनिक गोमंतक
गोवा

चिखली दाबोळी सर्कल अतिक्रमणाविरोधात नौदलाची पंचायतीची तक्रार

अतिक्रमण धारकांना पंचायतीकडून नोटीस

गोमन्तक डिजिटल टीम

चिखली दाबोळी येथे सर्कल जवळील पार्क समोरील गाड्यांच्या अतिक्रमणा विरोधात नौदलाकडून पंचायतीला तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीला अनुसरून सात दिवसाच्या आत सदर अतिक्रमणे हलवली नाही तर कडक कारवाई करण्यात येईल असे गाडे धारकांना पंचायत सचिवांनी नोटीसिद्वारे कळवले आहे. त्यामुळे गाडेधारकात नाराजी पसरली आहे. गाडे धारक पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो यांची भेट घेणार आहेत.

चिखली येथील मुख्य सर्कल पासून पाचशे मीटरच्या अंतरावर असलेल्या नेवल आर्मामेन्ट डेपो चिखली या नौदल कार्यालयाकडून पंचायतीसमोर तक्रार दाखल केली आहे की चिखली पार्क समोर अतिक्रमण करून उभे करण्यात आलेल्या चहाच्या गाड्यामुळे नेव्हल आर्मामेन्ट डेपोची पूर्व गेट ते चिखली सर्कल दरम्यान संरक्षक रस्ता अडवला जातो. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण केलेल्या गाड्या पासून मुक्त करण्यासाठी आवश्यक कारवाई करावी अशी तक्रारीत नौदलाने मागणी केली आहे.

सदर तक्रारीच्या अनुषंगाने चिखली पंचायत सचिवाणी सदर गाडे धारकांना काढलेले या नोटीसित पंचायतीकडून दिलेल्या परवान्यामध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीचे गाडे धारकांकडून उल्लंघन केले आहे. तर काही हात गाड्यांनी पंचायतीची परवानगी न घेता आपला व्यवसाय चालवला असल्याचे म्हटले आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नौदलाकडून प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सदर गाड्यांची परवानगी तत्काळ निलंबित करत असल्याचे म्हटले आहे. सदर नोटीस मिळताच सात दिवसाच्या आत बेकायदेशीर गाडे काढून टाकण्याचे निर्देश या नोटीसद्वारे दिले आहेत. असे न केल्यास पंचायत सदर गाड्यावर कठोर कारवाई सुरू करून गाडी जप्त केले जाते जाईल आणि त्यासाठी येणारा खर्च गाडे धारकाकडून वसूल केला जाईल. तसेच गाढेधारकांना पूर्व सूचना देऊन गाड्यांचा लिलाव केला जाईल असे या नोटीसित म्हटले आहे.

दरम्यान सदर नोटीस हातात पडल्याने गाडे धारकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या 40 वर्षापासून अधिक काळ आम्ही येथे व्यवसाय करत असून आज पर्यंत कोणतीच आडकाठी आली नव्हती. आता नौदलाने केलेल्या तक्रारीनुसार आमच्या गाड्यावर कारवाई करण्याची नोटीस पंचायती द्वारे दिली आहे. ही कितपत योग्य आहे असा सवाल या गाडेधारकांनी केला आहे. याविषयी आम्ही पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडे दाद मागणार असल्याचे गाडेधारकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: आकाशात इंजिननं घेतला पेट अन् 272 प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला! डेल्टा एअरलाईन्सच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग

हल्लेखोरांनी कार अडवली अन् 'शेलीं'ना ओढत नेलं, बगदादमध्ये भरदिवसा अमेरिकन महिला पत्रकाराचं अपहरण; सुरक्षा यंत्रणांकडून हाय अलर्ट

Ketu Nakshatra Parivartan: मघा नक्षत्रात केतुचं गोचर! 'या' 4 राशींसाठी 5 डिसेंबरपर्यंतचा काळ आव्हानात्मक; अचानक उद्भवणाऱ्या समस्यांमुळे आर्थिक गणित कोलमडणार

VIDEO: "आम्ही तयार आहोत, हिम्मत असेल तर समोर या" इराणी लष्कराचा थरारक सराव अन् अमेरिकेला थेट धमकी; व्हिडिओ होतोय व्हायरल

Goa Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य संशयितांना मोठा दिलासा! लुथरा बंधूंना म्हापसा सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT