भरतनाट्यम नृत्य Dainik Gomantak
गोवा

नवरसांची मैफल 'अनेक रस'

ख्रिस्तोफर गुरुसामी आणि बिल्वा रमण यांचे भरतनाट्यम सादर

दैनिक गोमन्तक

गोवा: मेरशी येथील साधना डेल आर्टमध्ये 9 व 10 मार्च रोजी ‘अनेक रस’ हा संगीत व नृत्य आणि चित्रकारीतेचा अंतर्भाव असलेला कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आज, 9 रोजी संध्याकाळी 6.30 वा. ख्रिस्तोफर गुरुसामी व बिल्वा रमण यांचे भरतनाट्यम सादर होईल. त्याच दिवशी चित्रकर्ती सोनिया सबरवाल यांच्या चित्रप्रदर्शनालाही सुरुवात होईल. 10 रोजी संध्याकाळी 6.30 वा. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मोहनवीणा (गिटार) वादक मनिष पिंगळे, संतूरवादक नरेश मडगांवकर, बासरीवादक सोनिक वेलिंगकर व तबलावादक डॉ. उदय कुलकर्णी यांची वाद्यमैफल रंगणार आहे.

हा कार्यक्रम मोनिशा मुकुंदन, अंगना जव्हेरी आणि महारुख देसाई यानी प्रयोजित केला आहे. भारतीय शास्त्रीय कलांच्याप्रती उत्कट निष्ठा आणि प्रेम या हे एकच कारण या आयोजनाच्या मुळाशी आहे असे अंगना जव्हेरी यानी ‘अनेक रस’बद्दल माहिती देताना सांगितले. दोन वर्षांपुर्वी या कार्यक्रमाचे प्रथम आयोजन झाले होते. कोविडमुळे गेल्या वर्षीहा कार्यक्रम होऊ शकला नाही. यंदा नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पुन्हा होतो आहे.हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

बिल्वा रमण

सुप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना लीला सॅमसन यांच्याकडे बिल्वा रमण यांनी भरतनाट्यम नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. भरतनाट्यमला संपूर्णपणे समर्पित असलेल्या बिल्वा रमण चेन्नई येथे भरतनाट्यम क्षेत्रात कार्यरत आहेत.

सोनिया सबरवाल

देशातील प्रतिष्ठित व महत्त्वाच्या चित्र प्रदर्शनात सोनीयाची चित्रे मांडली गेली आहेत. तिच्या चित्रांना अनेक महत्त्वाचे पुरस्कार लाभले आहेत. ललित कला अकादमीची संशोधन शिष्यवृत्ती तिला लाभली आहे.

सोनिया सबरवाल

देशातील प्रतिष्ठित व महत्त्वाच्या चित्र प्रदर्शनात सोनीयाची चित्रे मांडली गेली आहेत. तिच्या चित्रांना अनेक महत्त्वाचे पुरस्कार लाभले आहेत. ललित कला अकादमीची संशोधन शिष्यवृत्ती तिला लाभली आहे.

ख्रिस्तोफर गुरुसामी

ऑस्ट्रेलियात जन्मलेले आणि वाढलेले ख्रिस्तोफर भरतनाट्यमचे निष्ठावंत कलाकार आहेत. लीला सॅमसन यांच्या ‘स्पंद’ संस्थेचे ते सदस्य आहेत. ‘मद्रास म्युझिक अकादमी’मध्ये परफॉर्म करणाऱ्या त्याच्या पिढीतील आघाडीचे नर्तक म्हणून ते ओळखले जातात. न्यूयॉर्क टाइम्सने एक उत्कृष्ट नर्तक म्हणून त्याची गणना केली आहे.

मनीष पिंगळे

मनीष आज भारतातला आघाडीचा स्लाईड गिटारिस्ट म्हणून ओळखले जातात. भारतातच नव्हे तर युरोपमधील बहुतेक महत्त्वाच्या शहरात त्यांचे कार्यक्रम झाले आहे. आंतरराष्ट्रीय सेक्साफोन वादक जॉर्ज बुक्स, ब्लूज गायक मायकल मेसर, फ्रेंच संगीतकार हॅक्टर झाझू, आफ्रिकन कोरावादक लॅमिन सिसेखो त्याच्याबरोबर त्यांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे.

नरेश माडगावकर: गोव्यात संतूर वादनाची कुठलीही परंपरा नसताना, नरेशने या वाद्यावर गोव्यात राहूनच आपली हुकूमत मिळवली आहे. पुण्यातल्या भारती विद्यापीठातून त्याने संतूर या वाद्यावर ‘मास्टर्स’ पदवी मिळवली आहे. देशात तसेच विदेशात आपल्या संतूर वादनाने त्याने रसिकांना रिझवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT