Sal River Dainik Gomantak
गोवा

Navelim: सिकेटी-नावेली पुलाचे काम नावेलीवासीयांनी पाडले बंद!

Navelim: पोलिस संरक्षणात पुन्हा सुरवात : साबांखा मंत्री करणार पाहणी

दैनिक गोमन्तक

Navelim: गेली दहा वर्षे अपूर्णावस्थेत असलेल्या सिकेटी-नावेली येथील पुलाचे बांधकाम नव्याने सुरू झाले आहे. त्यामुळे आता नावेलीवासी त्याला विरोध करीत आहेत. सोमवारी स्थानिकांनी पुलाच्या बांधकामाजवळ एकत्रित येऊन पुलाच्या कामाला विरोध दर्शविला व बांधकाम बंद पाडले. मात्र, पोलिस संरक्षणात बांधकामाला सुरुवात झाली आहे.

हा पूल साळ नदीवर बांधला जात असून तो नावेली व बाणावलीला जोडणारा दुवा आहे. मात्र, नावेलीचे माजी आमदार आवेर्तान फुर्तादो यांनी काही नागरिकांसह साबांखा मंत्री नीलेश काब्राल यांच्या घरी जाऊन भेट घेतली व या पुलासंदर्भातील माहिती त्यांना दिली.

मंत्र्यांनी 2 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता पुलाची पाहणी करून परिस्थिती जाणून घेण्याची तयारी दर्शवली असल्याचे फुर्तादो यांनी सांगितले.

पूर्वी या पुलाची रुंदी कमी होती. आता या पुलाची रुंदी वाढविण्यात येत आहे. त्यामुळे काही घरांना त्याची झळ बसणार आहे. काही घरे पाडावी लागणार आहेत, म्हणून या पुलाच्या बांधकामाला विरोध होत आहे.

...म्हणून नागरिकांचा पुलाला विरोध

पश्र्चिम बगल रस्त्यामुळे बाणावली व नावेली गावे जोडली गेली आहेत. तळावली पुलाद्वारे नावेली व वार्का गावे जोडली गेली आहेत. त्यामुळे या सिकेटी पुलाची गरजच ती काय? असा प्रश्र्न करत आवेर्तान फुर्तादो यांनी या पुलाला विरोध दर्शविला आहे.

अरुंद रस्त्यांचा विस्तार व्हावा

हा रस्ता 12 मीटर रुंदीचा तर त्याला जोडणारे गावातील रस्ते केवळ ४ मीटर रुंदीचे आहेत. त्यामुळे या रुंद रस्त्यांचा त्रास लोकांना होत आहे. पुलाच्या रुंदीकरणासाठी जागा संपादन केली आहे का? असा प्रश्र्न करून सोमवारी जेव्हा मंत्री पाहणी करतील, तेव्हा त्यांना विरोध दर्शविणार असल्याचे फुर्तादो यांनी सांगितले.

या पुलामुळे येथील एकाही घराला बाधा पोहोचणार नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याने पुलावर जाण्यासाठीच्या रस्त्यासाठी यापूर्वीच जागा संपादित केली आहे. - प्रसाद पाणंदीकर, कार्यकारी अभियंते, साबांखा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT