Navdurga Gavshikanna Prakatotsav Dainik Gomantak
गोवा

नवदुर्गा गावशीकान्न देवीचा प्रकटोत्सव

मडकईत 23, 24 मे रोजी विशेष कार्यक्रमांचे आयोजन

दैनिक गोमन्तक

फोंडा : मडकई येथील श्री नवदुर्गा देवीचा पाचवा प्रकटोत्सव सोमवारी २३ व मंगळवारी २४ असे दोन दिवस मडकईतील पारंपई - तळेखोल येथील श्रीच्या स्थानावर विविध कार्यक्रमांनिशी साजरा करण्यात येणार आहे. मडकई येथील नवदुर्गा प्रकटोत्सव मंडळाच्या व्यवस्थापन समितीतर्फे या उत्सव काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

देशातील हा एकमेव प्रकटोत्सव असून गेल्या 9 मे 2018 पासून या उत्सवाला प्रारंभ झाला आहे. 481 वर्षांपूर्वी नवदुर्गा ‘गावशीकान्न' देवी पोर्तुगिजांच्या गोव्यातील धार्मिक छळाच्या काळात ‘देठली‘ नेसलेल्या महिलेच्या रुपात पारंपई - मडकई येथे गुराख्यांसमोर प्रकट झाली होती. त्यामुळेच हे स्थान भाविकांसाठी श्रद्धास्थान ठरले आहे. देवीच्या प्रकट लीलेनंतर श्रीचे भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आले.

सोमवारी 23 रोजी सकाळी साडेआठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत प्रकट स्थानावर अभिषेक व विविध धार्मिक विधी होतील. दुपारी साडेबारा वाजता देवी नवदुर्गा प्रकटोत्सवाला मशाल प्रज्वलनाने प्रारंभ होईल.

त्यानंतर दुपारी दीड वाजेपर्यंत लाडेवाडा - मडकई येथील वैरागी आरती मंडळातर्फे महाआरती होतील. दुपारी दीड वाजता तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. दुपारी दोन वाजता पारंपरिक अतिथींचा सन्मान करण्यात येईल. दुपारी तीन ते संध्याकाळी पाच वाजता भोम - अडकोण येथील युवती भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर संध्याकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत भोम येथील सुदेश नाईक व साथी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम होईल. रात्री नऊ ते अकरापर्यंत सुगम संगीताचा कार्यक्रम होणार आहे.

मंगळवारी 24 रोजी सकाळी साडेआठ ते संध्याकाळी पाचपर्यंत प्रकटोत्सव दर्शन सोहळा व सांगणे कार्यक्रम होईल. दुपारी साडेतीन ते पाचपर्यंत दिंडी वारकरी सांप्रदाय फोंडातर्फे हरिपाठ पारायण येईल. संध्याकाळी पाच वाजता प्रकटोत्सव सांगता सोहळा व आभारप्रदर्शनाने या उत्सवाची सांगता होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT