sports day Dainik Gomantak
गोवा

National Sports Day : धावे-तार येथील ज्ञानसागर विद्या मंदिरात क्रीडा दिवस उत्साहात साजरा

National Sports Day : मुलींमधून प्रीतम गावकर उत्कृष्ट खेळाडू ठरली. पिवळा गट उत्कृष्ट गट ठरला.

गोमन्तक डिजिटल टीम

National Sports Day : वाळपई, धावे-तार येथील ज्ञानसागर विद्या मंदिराचा क्रीडा दिवस उत्साहात साजरा झाला. उद्‍घाटन सोहळ्यास हनुमान विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक उदयकुमार पाटील, सावर्डेचे उपसरपंच शिवाजी देसाई, ज्ञानसागर शैक्षणिक व्यवस्थापक रणजित राणे, उपाध्यक्ष संजय गावकर, खजिनदार रामराव राणे, सचिव महादेव गावकर, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्ताराम गावकर व मुख्याध्यापक अभिषेक गावस उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन करून झाली. शिक्षिका रीना गावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर मशाल फिरवून व शपथ घेऊन खेळाला सुरवात झाली. मुलांनी वेगवेगळ्या कवायती सादर केल्या. त्यानंतर विविध खेळ खेळविण्यात आले. यात मुलांमधून अनिकेत सहानी हा उत्कृष्ट खेळाडू ठरला. मुलींमधून प्रीतम गावकर उत्कृष्ट खेळाडू ठरली. पिवळा गट उत्कृष्ट गट ठरला.

उदयकुमार पाटील यांनी मुलांचे कौतुक केले. ते म्हणाले की, आज खेळांना फार महत्त्व प्राप्त झालेले आहे. क्रीडा क्षेत्रात अनेक मुलांनी आपले भविष्य घडविले आहे, त्यामुळे पालकांनी मुलांच्या पुस्तकी ज्ञानाबरोबर खेळाला सुद्धा प्राधान्य देणे गरजेचे आहे.

सूत्रसंचालन शिक्षिका सोनाली तळनकर यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक महादेव गावकर यांनी केले. शिक्षिका प्रिया भाटेकर यांनी आभार प्रदर्शन केले. शिक्षिका पल्लवी पोळेकर, अजित वेळुसकर, देवकी गावकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT