National Human Rights Union opposes three projects in Margao Dainik Gomantak
गोवा

राष्‍ट्रीय मानवी हक्क संघाचा ‘त्‍या’ तीन प्रकल्‍पांना विरोध

अभयारण्य क्षेत्राला धोका

दैनिक गोमन्तक

मडगाव : मानवी हक्क संघटनांच्या राष्ट्रीय महासंघाच्‍या काल शनिवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्‍यात आले. त्यात गोव्यातील (goa) तीन लिनर प्रकल्पांना प्राणपणाने विरोध करणे व त्याचबरोबर हे प्रकल्प रद्द करेपर्यत ‘गोंयचो एकवोट’ बरोबर हातात हात घालून काम करणे यांचा समावेश आहे.

महासंघाच्या रौप्‍यमहोत्‍सवी स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या प्रकल्पांमुळे (project) मोले राष्ट्रीय उद्यान तसेच भगवान महावीर अभयारण्यातील क्षेत्राला धोका पोचणार असल्याचे ठरावात म्हटले आहे.

रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासाठी एकूण 138.37 हेक्टर वनजमीन लागणार असून 22,882 झाडे तोडावी लागतील. तर, 20,238 झाडे संरक्षक क्षेत्रांतील आहेत याकडे हा ठराव लक्ष वेधतो. पश्र्चिम घाटात गोव्यातील अधिकतम क्षेत्र येते व ते संरक्षक विभागात मोडते. त्यास दीडशे वर्षांचा इतिहास आहे. म्हणून पर्यावरणीयदृष्ट्याही त्याला महत्त्‍व आहे.

आणखी एका ठरावाद्वारे या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या लोकसमूहाला तसेच मेळावलीतील लोकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्‍यात आला. सरकारने तेथील लोकांची जमीन त्यांना परत करावी अशी मागणी यावेळी करण्‍यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

Imran Khan PTI Protest: 'इम्रान खानला सोडा, नाहीतर..', शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरपारची लढाई; 2000 पीटीआय कार्यकर्त्यांना अटक

Trigrahi Yog 2026: सूर्य, बुध आणि शुक्राचा महासंगम! 17 अक्टोबरपासून सुरु होणार 'या' राशींचा सुवर्णकाळ; जबरदस्त धनलाभाचा योग

Job Offer For Indians: 70,000 भारतीयांसाठी 'या' देशात रोजगाराची संधी! नोकरीच्या ऑफर्स पाहून घाई करू नका; सरकारचा इशारा

Vivo ने लॉन्च केला दमदार 5G स्मार्टफोन! 12GB RAM, 256GB स्टोरेजसह तब्बल 9,020mAh बॅटरी; पाहा फीचर्स अन् किंमत

SCROLL FOR NEXT