Group Dance Competition  Dainik Gomantak
गोवा

Group Dance Competition : होंडा येथे 8 जानेवारीला राष्ट्रीय समूह नृत्य स्पर्धा

National Group Dance Competition : या स्पर्धेत फक्त २० गटांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Group Dance Competition : पिसुर्ले, होंडा येथे गेल्या पन्नास वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने ८ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजता राष्ट्रीय पातळीवरील समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असल्याची माहिती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वजीत कृष्णराव राणे यांनी सालेली येथे बुधवार, २७ रोजी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी अध्यक्ष राणे यांनी सांगितले की, संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय पातळीवरील समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भरघोस अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रथम बक्षीस रोख रुपये ४० हजार, द्वितीय ३० हजार, तृतीय २० हजार, चौथे व पाचवे प्रत्येकी १० हजार रुपये तसेच प्रमाणपत्र व चषक देण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी १२ ते ३० पर्यंतच्या वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होता येणार आहे. नृत्य कोणत्याही भाषेत सादर करवे, यासाठी वेळमर्यादा ८ मिनिटे, कमीत कमी १२ जणांचा सहभाग असणे गरजेचे आहे. या स्पर्धेत फक्त २० गटांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.

मान्यवरांना आमंत्रण

यानिमित्ताने सुवर्णमहोत्सवी वर्ष उद्‌घाटन कार्यक्रमाला राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, तसेच पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम होंडा-पोस्तवाडा येथील होंडा माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राणे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT