National Games 2023 | Goa Government  Dainik Gomantak
गोवा

National Games 2023 वर राज्याने खर्च केले 450 कोटी रूपये; गेल्या 15 दिवसांत घेतले 300 कोटीचे कर्ज...

राज्याने विविध विकास प्रकल्पांसाठी कमाल मर्यादेच्या 40 टक्क्याहून अधिक कर्ज घेतले आहे.

Akshay Nirmale

Goa Govt Borrowed over 40 percent of Maximum limit: गोव्यात 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप गुरूवारी झाला. या स्पर्धेसाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी राज्याच्या निधीतून सरकारने 450 कोटी रूपये खर्च केल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, आर्थिक संकटामुळे गोवा सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी राज्याच्या कमाल मर्यादेच्या 40 टक्क्यांहून अधिक कर्ज घेतले आहे. विशेष म्हणजे, गेल्या 15 दिवसांत राज्याने बाजारातून 300 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

विविध विकासकामे, प्रकल्पांसाठी हे कर्ज घेतले आहे. या वर्षी जीएसटी भरपाई मिळालेली नाही, शिवाय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी राज्याने पायाभूत सुविधांवर स्वतःच्या निधीतून 450 कोटी रुपये आधीच खर्च केले आहेत, त्यामुळे हे कर्ज घ्यावे लागले आहे.

एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत विविध विकासकामांसाठी राज्याने राज्याने सुमारे 1500 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. आर्थिक वर्षासाठी राज्याची कर्ज घेण्याची मर्यादा 3500 कोटी रुपये इतकी आहे.

जास्त महसूल निर्माण न झाल्याने कर्ज घ्यावे लागले. राज्यात चालू असलेले प्रकल्प सरकार थांबवू इच्छित नाही. पर्यटन हंगाम सुरू झाल्यामुळे महसुलात वाढ होण्याची अपेक्षा आहे, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

गतवर्षी राज्याला जीएसटी भरपाई म्हणून 1300 कोटी रुपये मिळाले होते. दरम्यान, गेल्या वर्षी राज्याने खुल्या बाजारातून 1300 कोटी रुपयांहून अधिक कर्ज घेतले होते आणि कर्ज घेण्याची मर्यादा 3000 कोटी रुपये होती.

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी केंद्राच्या निधीचा भाग म्हणून राज्याला 250 कोटी रुपये देण्याची विनंती केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT