Goa School Education Dainik Gomantak
गोवा

Education Policy: ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा विकास शक्य'

Education Policy: ‘काणी नव्या युगाची’ नाटकाच्या शुभारंभ प्रसंगी मांद्रेचे सरपंच ॲड. अमित सावंत यांनी हे वक्तव्य केले आहे.

दैनिक गोमन्तक

Education Policy: मुलांच्या आवडीप्रमाणे मातृभाषेतून शिक्षण देणारे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अवलंबिल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचे प्रतिपादन मांद्रेचे सरपंच ॲड. अमित सावंत यांनी केले. नाटकाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

मांद्रे कॉलेज ऑफ कॉमर्स, इकॉनॉमिक्स अँड मॅनेजमेंटतर्फे आयोजित केलेल्या कला चेतना वळवईनिर्मित ‘काणी नव्या युगाची’ नाटकाच्या शुभारंभ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर मांद्रे कॉलेज व्यवस्थापन समितीचे आश्विन खलप, डॉ. प्रतीक्षा खलप, एन. जे. नाईक, मनोहर म्हामल, निवृत्त पोलिस अधीक्षक उमेश गावकर, मांद्रे कॉलेजचे प्राचार्य तुषार अन्वेकर उपस्थित होते.

प्राचार्य तुषार अन्वेकर यांनी आपल्या स्वागत व प्रास्ताविक भाषणात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्पष्ट केले. प्रा. चैताली गावस यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सिद्धी पवार यांनी आभार मानले.

नाटकाला पेडणे विकास परिषदेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीयमंत्री ॲड. रमाकांत खलप, मांद्रेचे सरपंच ॲड. अमित सावंत, उपसरपंच सौ. तारा हडफडकर, माजी पोलिस अधीक्षक उमेश गावकर, आश्विन खलप, डॉ. प्रतीक्षा खलप, एन. जे. नाईक, मनोहर म्हामल, प्राचार्य तुषार अन्वेकर, सप्तेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय, मांद्रेच्या प्राचार्य सौ. सुलक्षा गावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Flood Crisis: आधी पाण्यासाठी तडफडला, आता महापुराची भीती! निसर्गाच्या दुहेरी चक्रव्यूहात अडकला पाकिस्तान; भारताकडून कोणताही डेटा मिळेना

King Cobra Viral Video: 'स्टंट' पडला महागात! किंग कोब्राला किस करण्यासाठी झुकला अन् क्षणार्धात जीवघेणा हल्ला; व्हिडिओ पाहून अंगावर काटा

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी! रिपोर्ट कधी जाहीर होणार आणि पगारात किती वाढ होणार? जाणून घ्या सर्व काही

'वो दबाव नहीं, सम्मान का हकदार है...', रोहितच्या निवृत्तीच्या वृत्ताने माजी क्रिकेटपटू संतापला; गंभीर-अजित टार्गेटवर

Guru Gochar 2026: नक्षत्रांचा राजा आणि देवगुरुंची युती! 'या' 5 राशींच्या आयुष्यात सुरु होणार सोन्यासारखा काळ; व्यवसायात नव्या आयडिया ठरतील सुपरहीट

SCROLL FOR NEXT