National Education Policy Dainik Gomantak
गोवा

National Education Policy: 'गोव्यात लवकरच राष्ट्रीय शिक्षण धोरण'

येत्या शैक्षणिक वर्षापासून फाउंडेशन कोर्स ते उच्च शिक्षणापर्यंत ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020’ची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

दैनिक गोमन्तक

National Education Policy: येत्या शैक्षणिक वर्षापासून फाउंडेशन कोर्स ते उच्च शिक्षणापर्यंत ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020’ची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

या धोरणाच्या अंमलबजावणीकरिता आणि शिक्षकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्‍घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. (National Education Policy NEP Goa 2023)

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण कौन्सिलच्या वतीने या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शिक्षण सचिव एस. एस. गिल, प्रा. एच. के. सेनापती, एनसीईआरटीचे माजी संचालक प्रा. भुनेश्वर, शिक्षण खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर, उच्च शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, शिक्षण संचालक नागराज होन्नेकेरी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, येत्या शैक्षणिक वर्षांपासून राज्यातील शैक्षणिक व्यवस्थेचा ढाचा बदलेल. यासाठी शिक्षक, शिक्षण क्षेत्राशी संबंधित कर्मचारी, शैक्षणिक संस्था चालक यांना या धोरणाची माहिती व्हावी, यासाठी राज्य सरकारच्या वतीने विशेष प्रयत्न सुरू आहेत.

त्यासाठीच राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात देशभरातील 20 राज्यातील शिक्षण तज्ज्ञ शिक्षक सहभागी झाले आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीसाठी पथदर्शी आराखडा (रोडमॅप) तयार करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा असेल, असेही ते म्हणाले.

विविध विषयांवर सविस्तर चर्चा

या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची विविध आव्हाने, शैक्षणिक संस्थांशी संबंधितांमध्ये जनजागृती, या नव्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचा सहभाग कसा असावा.

याचा एकूणच शिक्षकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी फायदा होणारा असून या गटाच्या वतीने शिक्षण संचालनालयाला तशी शिफारस करण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Sri Lanka Test: भारत-श्रीलंका टेस्टचा थरार निर्णायक वळणावर! अखेरच्या दिवशी शुभमन गिलसमोर मोठं आव्हान, विजयासाठी काय असेल रणनीती?

Horoscope: ग्रहांची साथ मिळणार अन् आर्थिक स्थिती सुधारणार! मेष-तुळ राशीला लाभाचे संकेत, मिथुनसह 'या' राशींनी मोठे निर्णय टाळावेत

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

SCROLL FOR NEXT