Goa Accident
Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident:...आणि बहीण-भाऊ मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडले, दुचाकीचा चक्काचूर

Pramod Yadav

Goa Accident

लहान भावासह दुचाकीवरुन केपेच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीचा नाणूस येथे अपघात झाला. या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला असून, केवळ दैव बलवत्तर म्हणून बहीण-भाऊ बचावले आहेत.

अपघातात दुचाकी चालविणाऱ्या महिलेला किरकोळ जखम झाली असून, तिचा भाऊ सुखरुप आहे. नाणूस उसगाव येथे सकाळी ७.३० वाजता हा अपघात झाला.

सुनिती सुहास सावईकर (२३, रा. आंबेली-सत्तरी) असे या अपघातात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. अपघातानंतर उपचारासाठी तिला पिळये (तिस्क-उसगाव) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सुनिती सकाळी भावासह दुचाकीवरुन केपेच्या दिशेने जात असताना तिचा नाणूस उसगाव येथे अपघात झाला. दुचाकीवरील दोघेही खाली फेकले गेले. याचवेळी आलेला ट्रक दुचाकीवरुन गेल्याने दुचाकीचा चक्काचूर झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून या अपघातात बहीण - भाऊ दोघेही बचावले आहेत.

कसा झाला अपघात?

दुचाकीची खडीवाहू ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात विरुद्ध दिशेने आलेल्या एका दुचाकीची धडक स्कुटरला बसल्याने हा अपघात झाला. त्यानंतर ट्रकला दुचाकीची धडक बसल्याने अपघातात स्कुटरचा चुराडा झाला.

मार्गावर सुरु असणारी विविध कामे यामुळे रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mandrem Constituency: पर्यटनाला चालना देण्यासाठी चोपडे ते केरी रस्त्याचे रुंदीकरण; ४३ कोटींचा खर्च

नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील निर्दोष सुटलेल्या आणि खटला लढणाऱ्या वकिलाचा हिंदू जनजागृती समितीकडून गोव्यात सत्कार

Panjim News: गाडी चालवताना अचानक हातावर आला साप; भितीने उडाली गाळण

Goa Today's News Live: म्हापसा येथील बंद फ्लॅटमध्ये आढळला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

Mopa Airport: आक्रमक पवित्र्यामुळे ‘मोपा’वरील टॅक्सी पार्किंग दरवाढ मागे

SCROLL FOR NEXT