Goa BJP Press Conference Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: पैशांच्या बदल्यात सरकारी नोकरी प्रकरणातील आरोपीबाबत भाजपचं स्पष्टीकरण, काय म्हटलंय वाचा

Narendra Sawaikar: श्रुती कधीतरी अशा प्रक्रियेतून पक्षाची सदस्य झाली असेल, तिने पक्षाचे कामही केले असेल; पण सध्या तिच्याशी पक्षाचा संबंध नाही, असे सावईकर म्हणाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Bjp On Cash For Job Scam Accused Shruti Prabhugaonkar

पणजी: पैशांच्या बदल्यात सरकारी नोकऱ्या प्रकरणातील श्रुती प्रभुगावकर हिच्याशी भाजपचा आता कसलाही संबंध नाही, असे पक्षाचे राज्य सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. अशा प्रकरणात भाजपचा नेता, पदाधिकारी, कार्यकर्ता जरी असला तरी जनतेने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. एका कार्यकर्त्यामुळे पक्ष बदनाम होत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

यासाठी त्यांनी गावातील क्लबचे उदाहरण दिले. क्लबचा एक सदस्य वेगळा वागला तर त्याला काढून टाकण्यात येते. तसे पक्षाचे आहे. आताच भाजपची राज्यातील सदस्य संख्या ३ लाख ६२ हजार झाली आहे. ती चार लाखांच्या वर जाईल. त्यापैकी एक कोणी वेगळा वागला म्हणून अख्खा पक्ष बदनाम करणे योग्य नव्हे. तशा व्यक्तीला पक्षातून तत्काळ काढण्यात येते. यापुढेही तसे केले जाईल. श्रुती कधीतरी अशा प्रक्रियेतून पक्षाची सदस्य झाली असेल, तिने पक्षाचे कामही केले असेल; पण सध्या तिच्याशी पक्षाचा संबंध नाही, असे सावईकर म्हणाले.

विरोधी पक्षाने आरोप करणे साहजिक आहे. तसे २०१२ पासून ते आरोपच करत आले आहेत. त्यांनी मात्र आरोप करण्याआधी वस्तुस्थिती तपासून पाहावी. राज्यात कोणीही कोणासोबत छायाचित्र काढतो. इतर राज्यांसारखी येथे परिस्थिती नाही. कोणीही मंत्री, मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलतो. त्याचा अर्थ त्या व्यक्तीच्या कृत्यात ते सहभागी असतात, असा होत नाही.

सरकारने पोलिसांना या प्रकरणी तपासाचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. पारदर्शी प्रकारे तपास सुरू आहे. कर्मचारी भरती आयोग स्थापून अशा दुकानदारीला सरकारनेच टाळे ठोकले आहे. अशा नोकरी फसवणूक प्रकरणात मग तो कोणीही असो, कोणाचाही नातेवाईक असो सुटणार नाही. यापुढेही कोणी आमच्या पक्षाशी संबंधित सापडला तर त्याच्यावरही पक्ष कारवाई करणार, असे सावईकर यांनी सांगितले.

राज्यातील पोलिसांची गुप्तचर यंत्रणा असे प्रकार घडत असल्याची माहिती मिळवण्यात कमी पडली काय, असे विचारल्यावर ते सरकारला विचारा, असे सावईकर यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेश सचिव सर्वानंद भगत उपस्थित होते.

पक्षाने याप्रकरणी कोणालाही सोडू नये, अशी भूमिका घेतली आहे. सरकारने ते कृतीतून दाखवून दिले आहे. पोलिस तपासात कोणाचेही नाव समोर आल्यास त्याला ताब्यात घेण्यात येते. एक एफआयआर झाला; पण १८ जणांना आजवर अटक झाली आहे. तपासकाम अद्याप पूर्ण झालेले नाही, यामुळे यात आणखीन कोणी गुंतले असतील की नाही हे आताच सांगणे अवघड आहे. युवा वर्गाची स्वप्ने उद्ध्वस्त करणाऱ्यांना माफी नाही, असा संदेश सरकार आपल्या कृतीतून देत आहे.
ॲड. नरेंद्र सावईकर, ‘भाजप’चे राज्य सरचिटणीस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT