Narendra Modi Visit in Goa Dainik Gomantak
गोवा

नरेंद्र मोदींनी केलं प्रमोद सावंतांचं कौतुक, म्हणाले '100 टक्के काम..

गोव्यात आश्वासन देऊन ते पूर्ण करणारे सरकार म्हणजे फक्त भाजप सरकारच आहे. आणि याचे श्रेय मी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देतो; नरेंद्र मोदी

दैनिक गोमन्तक

Narendra Modi Visit in Goa: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज गोव्यात दाखल झाले आहेत. आज म्हापसा येथे त्यांनी जाहीर सभा घेऊन जनतेशी संवाद साधला. गोव्याच्या राजकारणातील भाजपचे महत्व त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांचे उत्कृष्ट कामाबद्दल कौतुकही केले. मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, 'गोव्यात इतर पक्ष अशा जाहीर सभा घेतात आणि फक्त खोटी आश्वासने देतात. पूर्ण काहीच करत नाहीत. गोव्यात आश्वासन देऊन ते पूर्ण करणारे सरकार म्हणजे फक्त भाजप सरकारच आहे. आणि याचे श्रेय मी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देतो. (Narendra Modi appriciated Pramod Sawant)

मी स्वत: अनेकदा मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे मला माहिती आहे की सरकारी योजना गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी किती कष्ट पडतात. मी हे सांगू शकतो की प्रमोद सावंत यांनी उत्तम काम केले आहे. यासाठी मी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी जे केले आहे, ते नक्कीच अभूतपूर्व आहे.

मी गोवेकरांना सांगू इच्छितो की, आमच्या युवा मुख्यमंत्र्यांचे लक्ष फक्त योजना सुरू करणे हेच नाही तर गोव्याच्या संकल्पांना 100% पूर्ण करणे हे त्यांचे ध्येय आहे. लसीकरणात गोवा अग्रेसर आहे, स्वच्छ भारत अभियानात गोवा पूर्णपणे कार्यान्वित आहे, जलजीवन मिशन, राज्यात वीजपुरवठ्यासाठीचे काम शिवाय गरजूंना मोफत राशन देण्यातही गोवा यशस्वी झाला आहे. एवढेच नाही तर आता गोवा अक्षय ऊर्जा प्रकल्पावरही 100% काम करत आहे, ह्या खूप मोठ्या गोष्टी आहेत. त्यामुळे अख्ख्या जगात गोव्याचे नाव होणार आहे; आणि हेच प्रमोद सावंत यांचे यश आहे.

यावेळी त्यांनी विरोधाकांवरही थेट वार केला. ते म्हणाले, 'खोटी आश्वासने देणाऱ्या, भेदभाव करणाऱ्यांना मला सांगावेसे वाटते की प्रमोद सावंत यांनी जे प्राप्त केले आहे, त्याचे तुम्ही अवलोकन करा. कारण योजना लोकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे फक्त सरकारी आकडेवारी मांडणे नसून, हे भाजपच्या (BJP) सिद्धांताचे, आमच्या कार्यशैलीचे जिवंत उदाहरण आहे; आणि हेच आमचे यश आहे.' शेवटी त्यांनी जनतेला पुन्हा एकदा भाजप सरकार सत्तेवर आणण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT