Narayan Rane And CM Pramod Sawant 
गोवा

Ratnagiri-Sindhudurg: नारायण राणे अडीच लाखापेक्षा जास्त मताधिक्याने जिंकतील; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना विश्वास

Ratnagiri-Sindhudurg Loksabha Seat: अनेक वर्षे शिवसेनेकडे असणारी ही जागा अखेर भाजपकडे गेली असून, येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Pramod Yadav

Ratnagiri-Sindhudurg

सिंधुदुर्ग-रत्नागिरीत नारायण राणे अडीच लाखापेक्षा जास्त मताधिक्याने जिंकतील असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. उमेदवारी जाहीर व्हायला वेळ लागला असला तरी याचा परिणाम अजिबात होणार नाही, असेही सावंत यावेळी म्हणाले.

राणेंच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रत्नागिरीत आयोजित रोड शोमध्ये सावंत यांनी हजेरी लावली.

अनेक वर्षे शिवसेनेकडे असणारी ही जागा अखेर भाजपकडे गेली असून, येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नारायण राणे आज (शुक्रवार) उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, यासाठी रत्नागिरीत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली आहे.

राणेंच्या रॅलीत महाराष्ट्राचे मंत्री दीपक केसरकर, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि नेते उपस्थित आहेत.

'एनडीएच्या कार्यकत्यांमध्ये उत्साह आहे. खूप वर्षांनी भाजपला ही जागा मिळाली आहे मला खात्री आहे इथे कमळ फुलेल नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संपूर्ण भारतात एक लाट आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जागा एनडीएच्या निवडून येतील,' असा विश्वास सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

'मोदी, शहा आणि नड्डाजी यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे भाजपला ही जागा दिली आहे. महाराष्ट्रातील 48 पैकी 40 पेक्षा जास्त जागा भाजप जिंकेल. गोव्यातील आम्ही दोन्ही जागा जिंकू. उमेदवारी जाहीर व्हायला वेळ लागला याचा परिणाम अजिबात होणार नाही, नारायण राणे अडीच लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विनायक राऊत यांचा पराभव करतील,' असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.

तसेच, 'संकल्पपत्र पूर्ण करण्याचा संकल्प भाजपने केला आहे. आम्ही मागील दोन संकल्प 99 टक्के पूर्ण केले आहेत. मोदीजी तिसऱ्या टर्ममध्ये मोठे निर्णय घेतील. तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपला देश पुढे येईल,' असेही सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Bomb Blast: पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तूनख्वामध्ये नमाजादरम्यान रक्ताचा सडा; भीषण आत्मघाती हल्ल्यात 16 ठार, 50 हून अधिक जखमी

Abhishek Sharma Shiva Celebration: 'प्लेयर ऑफ द सिरीज' ठरल्यानंतर अभिषेक शर्माचा मोठा खुलासा, सेंच्युरीनंतरच्या 'शिव सेलिब्रेशन'विषयी स्पष्टच सांगितलं; म्हणाला...

Porvorim Traffic Congestion: 'उन्‍नत'मार्गावर प्रगती, रस्त्यावर मात्र कोंडी

Jos Buttler World Record: 9 शतके, 107 अर्धशतके अन् 15000 धावा! टी-20 मध्ये बटलरने रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिलाच फलंदाज VIDEO

Mapusa Kidnapping Case: दोन अपहरण प्रकरणे, दोन राज्यात तपास अन् चौघांची सुखरुप सुटका, म्हापसा पोलिसांची धडक कारवाई; एक संशयित गजाआड

SCROLL FOR NEXT