Goa Police Arrests  Dainik Gomantak
गोवा

Calangute: खबऱ्याकडून मिळाली माहिती, महाराष्ट्र पोलिसांनी गोव्यातील बीच न् बीच घातला पालथा; अखेर कळंगुट येथे सराईताला केली अटक

Goa Crime News: महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. अनेक दिवसांपासून महाराष्ट्रासह इतर राज्यातील पोलिस देखील त्याच्या मागावर होते.

Pramod Yadav

नंदुरबार: चोरी, मारामारी यासह विविध गुन्ह्यात महाराष्ट्रासह इतर राज्यात पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगाराला गोव्यातून अटक करण्यात आली आहे. नंदुरबार पोलिसांनी संशयिताला गोव्यातील कळंगुट बीचवरुन अटक केली आहे. अनेक दिवसांपासून पोलिसांना चकमा देणारा संशयित गोव्यात असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली होती.

नागेश उर्फ नाकक्षा दमण्या पाडवी (वय २७, रा. कात्री, ता. धडगाव) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पाडवी याच्याविरोधात चोरी, मारामारी, मालमत्ता संबधित आठ गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. अनेक दिवसांपासून महाराष्ट्रासह इतर राज्यातील पोलिस देखील त्याच्या मागावर होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हेगार नागेश पाडवी हा गोव्यातील बीचवर असल्याची गुप्त माहिती नंदुरबार पोलिसांनी खबऱ्याने दिली. माहितीच्या आधारे पोलिसांनी विविध पथके तयार करुन गोव्यात पाठवली. पोलिसांनी गोव्यातील विविध बीच पालथे घातले. अखेर कळंगुट बीचवर पोलिसांनी नागेशच्या मुसक्या आवळल्या.

पाडवी याच्याविरोधात नंदुरबार जिल्ह्यात चोरी, मारामारी यासह मालमत्तासंबधित एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. या शिवाय इतर राज्यात देखील त्याच्याविरोधात गुन्हे नोंद आहेत. पोलिस अनेक दिवसांपासून फरार पाडवीच्या मागावर होते. अखेर गोव्यातून त्याला अटक करण्यात आलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT