Naibag Gunshot Dainik Gomantak
गोवा

Naibag Gunshot : "आम्हाला गँग्स ऑफ गोवा'ची भीती!" नायबाग येथे गोळीबार, 2 कामगार गंभीर जखमी; LOP यांचा सरकारवर निशाणा

Naibag Firing Goa: उगवे पोरसकडील नदीच्या किनारी झालेल्या या घटनेत दोन कामगार गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर बांबोळी येथे उपचार सुरु आहेत

Akshata Chhatre

Goa gunshot incident: गोव्यातील पेडणे तालुक्यातील नायबाग परिसरात तेरेखोल नदीच्या किनारी सोमवार (दि.२७) रोजी रात्री रेती (वाळू) व्यवसायातील वादातून गोळीबार झाल्याचा दावा काही नागरिकांनी केला आहे. उगवे पोरसकडील नदीच्या किनारी झालेल्या या घटनेत दोन कामगार गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर बांबोळी येथे उपचार सुरु आहेत.

जखमी झालेल्यांमध्ये रमेश पासावन आणि लाल बहादूर गोंड या दोन कामगारांचा समावेश आहे. जखमी कामगारांना तातडीने बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (GMC) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रमेश पासावन यांच्या हातातून आणि लाल बहादूर गोंड यांच्या मानेतून गोळी आरपार गेल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर आहे. पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे पुढील तपास करत आहेत. गोळीबार नेमका कुठे झाला आणि याचे कारण नेमके रेती व्यवसायातील वाद की आणखीन काही असल्याचा शोध घेण्याचे काम सध्या सुरू आहे.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा सरकारवर हल्ला

या गोळीबार घटनेनंतर गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. आलेमाव यांनी म्हटले की, गोव्यातील वाद आता गुन्हेगारीचे स्वरूप घेत आहेत.

"आम्ही नेहमीच सांगत आलो आहोत की गुन्हेगार आणि अशा पार्श्वभूमीच्या लोकांमध्ये पोलिसांचे भय राहिलेले नाही. भाजपचे गोवा सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात आणि गुन्हे रोखण्यात अपयशी ठरले आहे." आलेमाव यांनी 'गँग्स ऑफ गोवा' निर्माण होण्यापूर्वीच सरकारने कठोर कारवाई करावी, असा इशारा दिला आहे. ते पुढे म्हणाले, "गोवा आता कोणासाठीही सुरक्षित राहिलेले नाही. या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी भाजप सरकारचे अपयश उघड केले आहे."पोलिसांकडून कसून तपास सुरू

रेती व्यवसायातील हा वाद नेमका कशावरून झाला आणि गोळीबार करणारी व्यक्ती कोण होती, याचा तपास पेडणे पोलीस करत आहेत. गोव्यातील एका शांत भागात झालेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT