Nachinola Football Ground Dainik Gomantak
गोवा

Nachinola: फुटबॉलचं मैदान की 'ओपन बार'? नास्नोळ्यात मद्यपींचा उच्छाद; ग्रामस्थांची तक्रार

Nachinola Football Ground: नास्नोळा बिअरच्या बाटल्या फोडून टाकल्यामुळे त्या ठिकाणी चालणेही कठीण होत आहे. याबाबत नास्नोळा पंचायतीने गुरुवारी अज्ञात तरुणाईविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली असून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: नास्नोळा फुटबॉल मैदानाजवळ बिअरच्या बाटल्या फोडून टाकल्यामुळे त्या ठिकाणी चालणेही कठीण होत आहे. याबाबत नास्नोळा पंचायतीने गुरुवारी अज्ञात तरुणाईविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली असून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

गुरुवारी (ता. ५) या घटनेवर नाराज असलेल्या नास्नोळा सरपंच फ्रेडी फर्नांडिस यांच्यासह पंचायत सचिव रंजना राऊळ, पंचायत सदस्य गोवेकर, नीलेश, देविदास नेतार्डेकर आदींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली.

मागील दोन वर्षांपासून नास्नोळा पंचायत या विषयाबाबत आवाज उठवत आहे. यासंदर्भात म्हापसा पोलिसांना अनेक पत्रे देऊनही गस्त आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करुन नंतर बिअरच्या बाटल्या फोडून टाकल्या जातात, बाटल्या फेडणाऱ्यावर करावी, अशी वेळोवेळी मागणी केली जाते. परंतु अद्याप कारवाई होत नसल्याने पंचायतीने नाराजी व्यक्त केली आहे.

सरपंच फ्रेडी फर्नांडिस म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून आम्ही हा प्रश्न मांडत आहोत. मात्र कोणतीही कारवाई होत नाही. आम्ही म्हापसा पोलिसांना आमच्या मैदानाजवळ होत असलेल्या विविद असामाजिक कृत्यांबद्दल पत्र लिहित आहोत. परंतु आजपर्यंत कोणीही त्यावर आळा घालण्यासाठी आलेले नाही. उलट यात वाढ झाली आहे. रविवारी तरुण-तरुणी येऊन याठिकाणी खेळतात आणि रस्त्यावर बिअरच्या बाटल्या फोडून उपद्रव करतात. ही घटना वाईट आहे.

पंचायत सदस्य सतीश गोवेकर म्हणाले, नुकत्याच झालेल्या पंचायत मंडळाच्या बैठकीत आम्ही पंचायत कार्यक्षेत्रात नवीन बार किंवा वाईन स्टोअरला परवानगी न देण्याचा ठराव घेतला आहे. कारण, आमच्या कार्यक्षेत्रात अनेक आस्थापने आहेत. गावातील वाईन स्टोअर्सनी त्यांच्या वेळेचे पालन करुन व्यवसाय करावा आणि कोणीही नियम पाळत नसल्याची तक्रार आल्यास आम्ही परवानगीचे नूतनीकरण न करण्याबाबत गंभीर कारवाई देखील करू शकतो.

मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार!

फर्नांडिस म्हणाले, ३ डिसेंबरच्या नुकत्याच घडलेल्या घटनेत सहभागी असलेल्यांवर कारवाई करावी आणि उपद्रव निर्माण करणे, गुन्हेगारी कृत्ये करणे आणि गावातील सलोखा बिघडवणे याप्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी लेखी तक्रार आम्ही पोलिसांकडे केली आहे. सदर कारवाई न झाल्यास, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

Education System Crisis: सत्य निकेतनची इमारतच नाही, तर शिक्षण व्यवस्थाही ढासळतेय! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपासून शिक्षणाच्या बजेटपर्यंत गंभीर प्रश्न

Karapur Mega Project: 161 दिवसांनंतर कारापूरवासीयांचे आंदोलन अखेर मागे! 'वन गोवा' प्रकल्पाला काम बंद करण्याची पंचायतीची नोटीस; न्यायालयीन लढा मात्र सुरूच

Goa Forward AAP Alliance: 'गोवा फर्स्ट' आघाडीची तयारी अंतिम टप्प्यात! विजय सरदेसाईंना सर्वाधिकार; 'आप'सह समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT