Margao Municipality Dainik Gomantak
गोवा

मडगाव पालिका बैठकीत 'गदारोळ'

पुनर्लिलाव करा: दुकानांच्या भाड्यावरून वादंग

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: मडगाव पालिका क्षेत्रातील गांधी मार्केटमधील दुकाने कवडीमोलाने भाडेपट्टीवर दिल्याने पालिका बैठकीत गदारोळ झाला. भाड्याने दिलेल्या दुकानांचा पुनर्लिलाव करावा, अशी मागणी विरोधी नगरसेवकांनी केली.

मडगाव नागरपालिकेच्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली असली तरी अनेक मुद्यांवर वादंग झाले. काही नगरसेवकांनी नगराध्यक्ष लिंडन परेरा आणि मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांना धारेवर धरत या बैठकीच्या इतिवृत्तांताची नोंदणी न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. बैठकीला सर्व नगरसेवक उपस्थित होते.

गांधी मार्केटमध्ये असलेल्या दोन दुकानांचे भाडे 2007 मध्ये 5,800 रुपये होते ते 2022 मध्ये 1,890 रुपये कसे झाले? असा प्रश्न विचारून या दुकान लिलाव प्रक्रियेत मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष गुंतले असल्याचा आरोप नगरसेवक महेश आमोणकर यांनी केला. याविषयी पालिका प्रशासकांकडे तक्रार करणार असल्याचे आमोणकर यांनी सांगितले.

दुकानाच्या लिलावाचा ठराव 14 नगरसेवकांनी संमत केला असला तरी काही नगरसेवकांनी दबावामुळे हात उंचावून या ठरावाला संमती दिली असल्याचा आरोप त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT