Maina-Curchorem Police Dainik Gomantak
गोवा

Maina-Curchorem Police: सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मुस्लिम बांधवांची पोलिसात तक्रार

पोस्ट करणाऱ्याला लवकरात लवकर ताब्यात घेऊन कारवाई करण्याची मागणी

Kavya Powar

Maina-Curchorem Police: अनेकदा काहीजण धार्मिक भावनांचा अनादर करत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशीच एक घटना मडगावमधून समोर आली आहे. शुक्रवारी मुस्लिम बांधवांचा सण ईद-ए-मिलाद पार पडला. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी 'जुलूस' मिरवणूक काढण्यात आली होती.

यावरून एका व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट करत मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. याप्रकरणी मायना कुडतरी आणि फातोर्डा पोलीस स्थानकात संबंधिताबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

माहितीनुसार, संबंधित व्यक्तीकडून समाजमाध्यमांवर मुस्लिम तसेच ख्रिश्चन समुदायाबद्दल धार्मिक तेढ निर्माण करणारा मजकूर पोस्ट करण्यात आला होता. यामुळे हाऊसिंग बोर्डमधील जवळपास शंभरहून अधिक मुस्लिम बांधवांनी पोलीस स्थानकात जमा होत ही पोस्ट करणाऱ्याला लवकरात लवकर ताब्यात घेऊन कारवाई करण्याची मागणी केली.

आधी मायना कुडतरी आणि नंतर फातोर्डा पोलिसात जात त्यांनी तक्रार केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT