Goa Congress 
गोवा

Goa Congress: कमिशन मिळत नसल्याने गोमन्तकीय कलाकारांना संधी नाही, महाराष्ट्रातून तीन गायक - मिशेल रिबेलो

रवींद्र भवन, मडगावने महिला दिनानिमित्त आयोजित संगीत मैफलीसाठी 4 पैकी 3 गायकांना महाराष्ट्रातून आमंत्रित करणे धक्कादायक

Pramod Yadav

Goa Congress

रवींद्र भवन, मडगावने महिला दिनानिमित्त आयोजित संगीत मैफलीसाठी 4 पैकी 3 गायकांना महाराष्ट्रातून आमंत्रित करणे धक्कादायक आहे.

आम्ही या निर्णयाचा तीव्र निषेध करतो असे सांगून महिला दिन कार्यक्रमात गोव्यातील कलाकारांना कला सादरीकरणाची संधी द्यावी अशी मागणी काँग्रेस नेते आणि जिल्हा पंचायत सदस्य मिशेल रिबेलो यांनी केली आहे.

महिला दिन कार्यक्रमाबद्दल रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी केलेल्या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, काँग्रेस नेत्या मिशेल रिबेलो यांनी गोमंतकीय कलाकारांकडून कमिशन मिळत नसल्यानेच त्यांना सादरीकरणाची संधी दिली जात नाही असा आरोप केला आहे.

महिला दिनाच्या कार्यक्रमात साधना सरगम, वैशाली सामंत आणि आनंदी जोशी यांचे सादरीकरण असेल. हे सर्व गायक महाराष्ट्रातील आहेत. गोव्याची नाइटिंगेल लोर्ना किंवा हेमा सरदेसाई यांना का आमंत्रित केले नाही? गोव्यातील इतर प्रतिभावान गायकांना संधी का दिली नाही? असा सरळ सवाल मिशेल रिबेलो यांनी विचारला आहे.

रवींद्र भवन, मडगाव हे संपूर्ण सासष्टी तालुक्यासाठी आहे. मडगाव नगरपालिका क्षेत्रांतर्गत येणाऱ्या मतदारसंघातील तीन आमदारांनी शिफारस केलेल्या तियात्रांनाच राजेंद्र तालक सभागृह कसे देवू शकतात? सासष्टीच्या सर्व आमदारांच्या शिफारसी त्यांनी घेणे बंधनकारक आहे असा दावा मिशेल रिबेलो यांनी केला आहे.

रवींद्र भवन, मडगाव हे भाजप कार्यकर्त्यांचे राजकीय पुनर्वसन केंद्र बनले आहे. कार्यकारिणीवर नियुक्त झालेल्या सदस्यांना कला आणि संस्कृतीचा गंध नाही. कला आणि संस्कृतीकडे संबंधीत प्रत्येक सदस्याची माहिती सरकारने उघड करावी, अशी मागणी मिशेल रिबेलो यांनी केली आहे.

रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक हे संगीत आणि नृत्याचे वर्ग घेणाऱ्या एका खाजगी संस्थेशी संबंधित आहेत. आपले हितसंबंध तेथे गुंतल्यानेच रवींद्र भवनात संगीत, नृत्य आणि नाट्य प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याची त्यांची तयारी नाही, असे मिशेल रिबेलो यांनी उघड केले.

सरकारने मडगावच्या रवींद्र भवनात एप्रिलपासून मुले आणि तरुणांसाठी संगीत, नृत्य आणि नाट्य प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत, अशी आमची मागणी आहे, असे न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा मिशेल रिबेलो यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: केळशी हादरली! विहिरीत आढळला ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह; गळ्यात आढळली दोरी, संशयाची सुई खुनाच्या दिशेने?

Meta Smart Glasses: "सावधान! तुमचे खाजगी क्षण कोणीतरी पाहतंय!" मेटा चष्म्यांनी टिपलेले व्हिडिओ होतायत लीक; केनियातील डेटा वर्कर्सचा धक्कादायक खुलासा

Morgan Stanley Layoffs: "70 अब्ज डॉलर्सचा नफा, तरीही नोकरीवर गदा!" मॉर्गन स्टॅनलीनं 2500 कर्मचाऱ्यांना दिला नारळ; 'हे' कारण ठरलं नोकरी जाण्याचं

Navpancham Rajyog: "नशिबाची साथ अन् पैशांचा पाऊस!" नवपंचम राजयोग बदलणार 'या' 3 राशींचं भाग्य; करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार

Louis Berger Case: 'मी जेलमध्ये गेलो अन् खरे गुन्हेगार मंत्री झाले!' लुईस बर्जर प्रकरणी चर्चिल आलेमाव कडाडले; राजकीय सूडबुद्धीने गोवल्याचा केला गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT