Govind Gaude |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Music Program: गोमंतकीय कलाकारांच्या हितालाच नेहमी प्राधान्य!

Music: फोंड्यात कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी संगीत संमेलनाचे उद्‍घाटन केले.

दैनिक गोमन्तक

Music: गोमंतकीय कलाकारांना प्रोत्साहन देताना कुठल्याच संस्थेवर किंवा कलाकारांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता राज्याचे कला संस्कृती खाते घेत असून संगीत संमेलन असो वा एखादा सांगितिक कार्यक्रम असूदे, अशा कार्यक्रमांना खात्याने परवानगी देऊन कलाकारांचे हित जपले आहे,असे उद्‍गार कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी काढले.

फोंड्यात काल फोंडा पत्रकार संघातर्फे तसेच गिरिजाताई केळेकर संगीत संमेलन समितीतर्फे आयोजित संगीत संमेलनाचे उद्‍घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पत्रकार अवित बगळे, संमेलन समितीचे अध्यक्ष जयंत मिरिंगकर, आयोजन समितीचे अध्यक्ष संजय घाटे, स्वागताध्यक्ष रघुनाथ फडके व पत्रकार नरेंद्र तारी उपस्थित होते.

गोविंद गावडे म्हणाले की, आपण जेव्हा या खात्याचा ताबा घेतला, तेव्हापासून सांगितिक कार्यक्रमांना प्राधान्यच दिले आहे. कलाकाराने कसलाच गर्व अंगी न बाळगता नम्र होऊन कलेची ही पालखी खांद्यावर घ्यावी. त्यासाठी संगीत कलेचा रियाज हा भक्कम पायावर असावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पत्रकार अवित बगळे म्हणाले की, ज्येष्ठ कलाकारांनी युवा कलाकारांना निरपेक्ष भावनेने सहकार्य करावे. गोव्यात कलेच्या क्षेत्रातील दुर्मिळ अशी वाद्ये आजही सापडतात, त्यांच्या संवर्धनासाठी सरकार आणि कलाप्रेमी संस्थांनी पुढाकार घ्यावा.पहिल्या सत्रात मुंबई येथील अपूर्वा गोखले यांचे सुरेख गायन झाले. त्यांना संवादिनीवर दत्तराज सुर्लकर तर तबलासाथ मयांक बेडेकर यांनी केले.

प्रारंभी देवश्री च्यारी हिने गणेशस्तवन सादर केले. त्याला संवादिनीसाथ दामोदर च्यारी तर तबलासाथ ग्रजेश तारी यांनी केली. स्वागत रघुनाथ फडके यांनी केले. जयंत मिरिंगकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सुभाष जाण यांनी केले. संजय घाटे यांनी आभार मानले.

तसेच, कलाप्रेमी पुरस्कार कृतार्थ या संस्थेचे राजेंद्र देसाई यांना तसेच पं. जीतेंद्र अभिषेकी यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार यंदा ज्येष्ठ संवादिनीवादक विठ्ठल खांडोळकर व लक्ष्मीकांत घाटे स्मृती पुरस्कार ज्येष्ठ कलाकार व्यंकटेश परवार यांना देण्यात आला. यावेळी सत्कारमूर्तींतर्फे राजेंद्र देसाई यांनी तर पत्रकारांतर्फे नरेंद्र तारी यांनी मनोगत व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT