Kolhapur Dainik Gomantak
गोवा

Goa News : संगीत नाट्यस्पर्धेत गोव्याचे ‘संत कबीर’ दुसरे

Goa News : मुंबईचे 'जय जय गौरीशंकर' पहिले; रत्नागिरीचे ‘अमृतवेल’ तिसरे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News :

कोल्हापूर- बासष्टाव्या महाराष्ट्र राज्य संगीतसूर्य केशवराव भोसले हौशी संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबई वाघांचे येथील परस्पर सहाय्यक मंडळाच्या ‘संगीत जय जय गौरीशंकर'' या नाटकाला पहिला क्रमांक मिळाला.

गोव्याच्या सान्वी कला मंचच्या ‘संगीत संत कबीर'' या नाटकाला दुसऱ्या क्रमांकाचे तर रत्नागिरीच्या खल्वायन संस्थेच्या ‘संगीत अमृतवेल'' या नाटकाला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

याबाबतची घोषणा आज सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केली. येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत ही स्पर्धा झाली.

स्पर्धेत एकूण १७ नाट्यप्रयोग सादर झाले. सविस्तर निकाल ः दिग्दर्शन - घनश्याम जोशी (जय जय गौरीशंकर), जयेंद्रनाथ हळदणकर (संत कबीर), नाट्यलेखन - महादेव हरमलकर (संत कबीर), श्रीकृष्ण जोशी (अमृतवेल), संगीत दिग्दर्शक- शिवानंद दाभोळकर (संत कबीर), राम तांबे (अमृतवेल),

नेपथ्य- प्रदिप तेंडुलकर (अमृतवेल), मनस्वी हरमलकर (संत कबीर), संगीतसाथ आर्गन वादक- हर्षल काटदरे (जय जय गौरीशंकर), स्वानंद नेने (अमृतवेल), संगीतसाथ तबला वादक- हेरंब जोगळेकर (अमृतवेल), अथर्व आठल्ये (जय जय गौरीशंकर), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक : पुरुष - अनिकेत आपटे (अमृतवेल), अरुण कदम (घाशीराम कोतवाल); स्त्री- अनुष्का आपटे (लावणी भूलली अभंगाला), समीक्षा मुकादम (जय जय गौरी शंकर), संगीत गायन रौप्यपदक : पुरुष- विशारद गुरव (जय जय गौरी शंकर),

प्रवीण शिलकर (अहम देवयानी); स्त्री : शारदा शेटकर (सन्यस्त खड्ग), सावनी शेवडे (अमृतवेल), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे : करुणा पटवर्धन (ययाती देवयानी), देवश्री शहाणे (जय जय गौरीशंकर), अक्षता जोशी (संभवामी युगे युगे), आध्या कारखानीस (संत कबीर), प्रान्वी गणपुले (चला आळंदीला), अभिजीत केळकर (आरंभी स्मरितो पाय तुझे), नितीन कोलवेकर (प्राक्तन योग), गुरुप्रसाद आचार्य (जय जय गौरीशंकर),

दशरथ नाईक (संत कबीर), विश्वास पांगारकर (लावणी भूलली अभंगाला), गायनासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे : वेदवती परांजपे (आरंभी स्मरितो पाय तुझे), श्रीजी पडते (अहंम देवयानी), श्रध्दा जोशी (संत कबीर),

जानव्ही खडपकर (धाडीला राम तिने का वनी), यशश्री जोशी (आरंभी स्मरितो पाय तुझे), सूरज शेटगावकर (चला आळंदीला), गिरीश जोशी (धाडीला राम तिने का वनी), साईराज कोलवाळकर (अहंम देवयानी), अनामय बापट (अमृतवेल), वज्रांग आफळे (लावणी भूलली अभंगाला)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT