Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: पर्रीकरांनी विश्वास घातकी म्हटले त्याच गॉडमनला भाजपात प्रवेश; मोदी परिवारात देशद्रोही लोक - पाटकर

Goa Congress: अहंकारी आणि हुकूमशाही मोदी सरकार 4 जून 2024 ला नक्कीच पडेल, असा दावा अमित पाटकर यांनी केला.

Pramod Yadav

Goa Congress

दिगंबर कामत यांच्यासारखे संविधानाचे हत्यारे, प्रज्वल रेवण्णासारखे महिलांचे लैंगिक शोषण करणारे, के. सुधाकरसारखे काळा पैसा जमा करणारे मोदी का परिवाराचे भाग आहेत.

अशा समाजकंटकांना आणि देशद्रोही लोकांना दिलेले प्रत्येक मत नरेंद्र मोदींना जाते. ही भाजपची गॅरंटी आहे, अशी बोचरी टीका काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ज्यांना ‘विश्वास घातकी’ असे संबोधले होते, त्या गॉडमन दिगंबर कामत यांना भाजपने प्रवेश दिला. आज त्यांच्यासारखेच अनेक दगाबाज आणि फसवणूक करणारे भाजपमध्ये आहेत.

संकल्प आमोणकर, रुडॉल्फो फर्नांडिस, आलेक्स सिक्वेरा आणि इतर पक्षबदलू घटकांनी संपूर्ण भाजप संघटनाच हायजॅक केल्यामुळे तळागाळातील भाजप कार्यकर्त्यांना आता कोणी वालीच राहिलेला नाही, असे पाटकर म्हणाले.

जेडीएस उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांच्या चारित्र्याबद्दल भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शहा यांना इशारा देऊनही, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रज्वल रेवण्णाचा प्रचार केला आणि रेवण्णा यांना दिलेले मत मोदींनाच असेल असे लोकांना आवाहन केले, असे अमित पाटकर म्हणाले.

नोटाबंदीमुळे भारतातील काळा पैसा संपेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. पण, कर्नाटकातील चिक्कबल्लापुरा येथील भाजपच्या लोकसभा उमेदवाराला निवडणूक आयोगाने 4.8 कोटी रोख रकमेसह कसे पकडले? असा सवाल पाटकर यांनी केला.

सध्या मोदी परिवारात असलेल्या संविधानाचे हत्यारे, महिलांचे लैंगिक शोषण करणारे आणि काळा पैसा जमा करणाऱ्यांवर बोलण्याचे धाडस करावे असे माझे भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना आव्हान आहे. या सगळ्यांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी अमित पाटकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT