Murder Dainik Gomantak
गोवा

शिगमोत्सवाच्या धामधुमीत डिचोलीत युवकाचा खून!

साथीदाराकडूनच कृत्य: संशयिताला पोलिसांकडून अटक

दैनिक गोमन्तक

डिचोली: ऐन शिगमोत्सवाच्या धामधुमीत काल (रविवारी) रात्री उशिरा डिचोली शहरात झालेल्या युवकाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. युवकाचा मृत्यू हा खुनाचाच प्रकार असल्याचे स्पष्ट झाले असून साथीदारानेच डोक्यावर दगड मारल्याने गावकरवाडा-डिचोली येथील अरुण अशोक परब (वय 40) या युवकाचा मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी डिचोली पोलिसांनी संशयित साथीदार आणि तेथीलच रहिवासी रामेश्वर प्रशांत वाडकर (वय 21) याला अटक केली आहे.

मयत अरुण परब आणि संशयित रामेश्वर वाडकर यांच्यात आठ दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता. अरुण याने रामेश्वर याला शिव्याही दिल्या होत्या अशी माहिती मिळाली आहे. त्या रागातूनच दोघांमध्ये पुन्हा वाद उफाळून आला. त्यातूनच दोघांमध्ये मारामारी होवून ही घटना घडली असावी असा अंदाज आहे.

मयत आणि संशयित एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती मिळाली आहे. डिचोली पोलिसांना पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली असता, अरुण परब रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत, तर रामेश्वर वाडकर बेशुद्धावस्थेत आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी बांबोळी येथे पाठवला, तर जखमी रामेश्वर याला उपचारार्थ इस्पितळात दखल केले.

आज (सोमवारी) सकाळी फॉरेन्सिक विभागाच्या तज्ज्ञांना पाचारण करून रक्ताचे नमुने आदी पुरावे गोळा केले. ठसे तज्ज्ञानाही पाचरण करण्यात आले. घटनास्थळी पोलिसांना दारूची बाटलीही मिळाली आहे. याप्रकरणी उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक सोबीत सक्सेना आणि डिचोलीचे पोलिस उपअधीक्षक सागर एकोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश गडेकर यांनी तपासकाम हाती घेत चोवीस तासाच्या आत या प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळवले. डिचोली पोलिसांनी भादंसंच्या 302 कलमाखाली गुन्हा नोंद केला असून इस्पितळातून डिस्चार्ज मिळताच संशयित रामेश्वर याला अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास हाती घेतला आहे.

अशी झाली हत्त्या

अरुण परब आणि संशयित रामेश्वर वाडकर काल सायंकाळी शिगमोत्सवात सहभागी झाले होते. दोघेही मद्याच्या नशेत होते. रात्री दारू ढोसून घरी परतत असताना बंदरवाडा येथील अभिनव दूध सोसायटीच्या आवारात काळोखाची संधी साधून रामेश्वर यांनी आठ दिवसांपूर्वीचा वाद उरकून काढला. त्यातूनच दोघांमध्ये वाद होऊन झटापट झाली. त्याचवेळी संशयित रामेश्वर याने अरुण याच्या डोक्यावर दगड मारला. त्याबरोबर अरुण खाली कोसळला आणि त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. अतिरक्तस्त्रावामुळे अरुण जागीच गतप्राण झाला, तर झटापटीवेळी रामेश्वर हाही जखमी झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT