Vijay Sardesai Dainik Gomantak
गोवा

Fish Market : पालिका, एसजीपीडीएचे मासळी मार्केटकडे दुर्लक्ष : विजय सरदेसाई

Vijay Sardesai : स्वच्छतेची जबाबदारी झटकताहेत

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी, फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी आज एसजीपीडीए किरकोळ मासळी मार्केटची पाहणी केली व तेथील अस्वच्छता तसेच दुर्दशा पाहून ते व्यथित झाले.

मासळी मार्केटचा परिसर व आतील भाग स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी मडगाव पालिका व एसजीपीडीएची जबाबदारी असून या दोन्ही संस्था आपले कर्तव्य पार पाडत नसून जबाबदारी झटकत आहेत, असे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.

मासळी मार्केटची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.

मार्केट परिसरातील कचराही व्यवस्थितपणे हटविला जात नाही. त्यामुळे या मार्केटच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याचेच दिसून येत आहे, असेही सरदेसाई म्हणाले.

या परिस्थितीत सध्या आपण कंत्राटदाराला मार्केट स्वच्छ करण्यास सांगितले आहे. फातोर्डात नगरपालिकेचे झाडूवाले दिसतच नाहीत.

मजूर फक्त कामतांच्या दिमतीला!

नगरपालिकेचे सर्व मजूर केवळ मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्याच दिमतीला असल्याचे दिसते, अशी टीकाही त्यानी केली. त्यामुळे आपण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मजुरांकडून मार्केट स्वच्छ करुन घेतो.

विधानसभेच्या अधिवेशनात या मार्केटच्या स्वच्छतेचा प्रश्र्न आपण उपस्थित करणार असल्याचेही विजय सरदेसाई यांनी यावेळी सांगितले.एसजीपीडीए मासळी विक्रेत्यांकडून वाढीव शुल्क आकारणीचा विचार करीत आहे. ‘एसजीपीडीए’ने प्रथम विक्रेत्यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्या व नंतरच शुल्क वाढीचा विचार करावा, असे सरदेसाई यानी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT