Atal Setu 
गोवा

Atal Setu: 'अटल सेतू'मुळे मुंबई - गोवा अंतर कमी होणार, दक्षिण भारत प्रवासाचा वेळही वाचणार

अटल सेतूसाठी अंदाजे 17,840 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, हा भारतातील सर्वात लांब पूल आहे.

Pramod Yadav

Atal Setu: मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (MTHL) 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी - न्हावाशेवा अटल सेतू' असे नाव देण्यात आले आहे. शुक्रवारी (12 जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी अटल सेतूचे उद्घाटन करतील.

अटल सेतूसाठी अंदाजे 17,840 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, हा भारतातील सर्वात लांब पूल आहे. तसेच, तो देशातील सर्वात लांब सागरी पूल देखील आहे. डिसेंबर 2016 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते या पुलाची पायाभरणी करण्यात आली होती.

सहा लेन अटल सेतू 21.8 किमी लांब आहे. समुद्रातील पुलाचे अंतर 16.5 किमी असून जमिनीवरील अंतर सुमारे 5.5 किमी आहे. पूलामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जलद कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

याशिवाय मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारत प्रवासाचा वेळ देखील कमी होणार आहे. यामुळे मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे.

'शहरी वाहतूक पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासह मोबिलिटी सुधारणे हे पंतप्रधानांचे ध्येय आहे. पंतप्रधान मोदी 'ईस्टर्न फ्रीवे ऑरेंज गेट' ते मरीन ड्राइव्हला जोडणाऱ्या रोड बोगद्याचे भूमिपूजनही करतील.

सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन- स्पेशल इकॉनॉमिक झोन (SEEPZ-SEZ) येथे रत्न आणि दागिने क्षेत्रासाठी 'भारतरत्नम' (मेगा कॉमन फॅसिलिटेशन सेंटर) चे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Broiler Chicken Rates Hike: गोव्यात मासळीनंतर ब्रॉयलर चिकनही महाग, खवय्यांच्या खिशाला मोठी कात्री; किलोमागे दरात 30 ते 40 रुपयांची वाढ

Goa Politics: CM पदाच्या शर्यतीत भंडारींपैकी कोणाचेच नाव नाही! रवी नाईकांनंतर भंडारी समाजात 'मॅग्नेटिक' नेत्याचा दुष्काळ; 2027 च्या निवडणुकीत कुणाचे भवितव्य पणाला?

Goa Politics: मुख्यमंत्र्यांनी गोवा विकायला काढला? काँग्रेसच्या 'राखण यात्रे'तून प्रमोद सावंतांवर थेट हल्लाबोल; साखळीचा 'सिकंदर' कोण? 

Goa ST Political Reservation: 'आता फसवणूक सहन करणार नाही!' 2027 च्या निवडणुकीपूर्वी एसटी समाजाला आरक्षण द्या; गोव्यात आंदोलनाचा एल्गार

Mhadei Water Dispute: केंद्राला पत्र पुरे, कोर्टाकडून पाहणीचा आदेश मिळवा! म्हादईचा लढा निर्णायक वळणावर; संयुक्त पाहणीसाठी गोव्याचा मोठा डाव

SCROLL FOR NEXT