Mumbai High Court Dainik Gomantak
गोवा

Mumbai High Court: गोवा फाऊंडेशनची पिसुर्ले खनिज डंप याचिका अखेर कामकाजात दाखल

Mumbai High Court: न्यायालयाने डंप हलवण्याबाबत दिलेल्या स्थगितीवर काल शिक्कामोर्तब केले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Foundation: गोवा फाऊंडेशनने पिसुर्ले येथील दामोदर मंगलजी खाणीवरील डंपबाबत 19 जानेवारी 2022 ला सादर केलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल कामकाजात दाखल करून घेतली. यामुळे न्यायालयाने 12 एप्रिल 2022 रोजी हे डंप हलवण्याबाबत दिलेल्या स्थगितीवर काल शिक्कामोर्तब केले आहे.

न्यायालयातून मिळालेल्या माहितीनुसार, पिसुर्ले येथील दामोदर मंगलजी खाणीवरील डंप हलवण्यासाठी खाण आणि भूगर्भशास्त्र खात्याने ई-लिलाव जाहीर केला होता. हा ई-लिलाव वेदांता कंपनीने मिळवला होता.

मात्र, मालाच्या दर्जाबाबत संशय आल्याने गोवा फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जानेवारीमध्ये जनहित याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने या संबंधित मालाची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची बाब गोवा फाऊंडेशनने न्यायालयाच्या निदर्शनास आणली होती.

तसेच, या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी झाल्याशिवाय वेदांता कंपनीला हा माल हलवण्यासाठी परवानगी देऊ नये, अशी ही जनहित याचिका आहे. वेदांताने हा माल यापूर्वीच दामोदर मंगलजी खाणीवरून आमोणा जेटीवर हलवला आहे.

आता एसआयटीच्या चौकशीशिवाय आणि न्यायालयाच्या सुनावणीशिवाय हा 1 लाख 80 हजार टन खनिज माल हलवता येणार नाही. यासंबंधीची वेदांताची विनंतीही न्यायालयाने फेटाळली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT