Mumbai-Goa Tejas Express
Mumbai-Goa Tejas Express Dainik Gomantak
गोवा

Mumbai-Goa Tejas Express: मुंबई-गोवा प्रवासाची रंगत वाढणार, तेजस एक्स्प्रेसला मिळणार दुसरा विस्टाडोम कोच

Pramod Yadav

Mumbai Goa Tejas Express: मुंबई ते गोव्यातील करमाळी दरम्यान धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसला 14 एप्रिलपासून आणखी एक विस्टाडोम कोच मिळणार आहे.

यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांना आजूबाजूच्या नयनरम्य दृश्यांचा आनंद घेता येणार आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

विस्टाडोम कोचमध्ये काचेच्या खिडक्या आणि पारदर्शक छत आहे. यामुळे निसर्गाची अनुभूती घेत प्रवास करता येतो. आता तेजस एक्स्प्रेसला आणखी एक विस्टाडोम कोच मिळणार असल्याने प्रवासाची रंगत आणखी वाढणार आहे.

मुंबई ते पुणे आणि गोवा रेल्वे विभागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये विस्टाडोम कोच हे डबे खूप लोकप्रिय आहेत. अनेक प्रवासी विस्टाडोम कोचने प्रवास करण्यास पसंती देतात.

कोकण पट्ट्यातील धबधबे, नद्या, घाट, बोगदे, हिरवागार निसर्ग, गर्द झाडी आणि डोंगर दऱ्या यांचे विहंगम दृश्य आता प्रवाशांना अनुभवता येणार आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबई-करमाळी तेजस एक्स्प्रेसमध्ये व्हिस्टाडोम कोच बसवण्यात आला होता. आता त्याची संख्या दोन केल्याने अनेक प्रवशांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. सुट्टीच्या तोंडावर हा बदल केल्याने प्रवशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ट्रेनमध्ये या वर्गाचा आणखी एक विस्टाडोम कोच बसवल्यानंतर, ही ट्रेन दोन विस्टाडोम कोच असलेली देशातील पहिली ट्रेन ठरेल.

विस्टाडोम कोचमध्ये एलईडी दिवे, 'फिरता येण्याजोगे' आसन आणि जीपीएस-आधारित माहिती प्रणालीसह अत्याधुनिक सुविधा आहेत. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बदल केल्यानंतर ट्रेनमध्ये दोन विस्टाडोम कोच, 11 एसी चेअर कार, एक एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कार कोच आणि दोन लगेज कोच आणि एक जनरेटर-कम-ब्रेक व्हॅन असेल. असे मध्य रेल्वेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

PM Modi ON UCC: ‘’गोव्यातील लोक एक सारखे कपडे घालतात का?’’ समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर मोदी स्पष्टच बोलले

United Nations: इस्रायलच्या समर्थनार्थ पहिल्यांदाच UN बैठक, अमेरिकेने दिला पूर्ण पाठिंबा; इस्त्रायली लष्कर राफाह शहरात घुसले!

SSC Result 2024 : पेडणे तालुक्यातील ३२ पैकी १५ शाळांचा निकाल १०० टक्के

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

SCROLL FOR NEXT