Mumbai Goa Highway Dainik Gomantak
गोवा

लाज वाटते! 'राष्ट्रीय नव्हे पायवाट पण म्हणायच्या लायकीचा नाही', मुंबई - गोवा महामार्गावरील तरूणाचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई - गोवा महामार्गाचे काम मागील 12 वर्षांपासून रखडले आहे.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गाचे काम मागील 12 वर्षांपासून रखडले आहे. या महामार्गावरील अपघातांची समस्या असो किंवा खड्यांची समस्या असो त्या वेळोवेळी समोर आल्या आहेत. नुकतेच, महामार्गावील खड्यांवरून न्यायालयाने राज्य सरकारला खडे बोल सुनावत दंडही ठोठावला.

सध्या पावसाळ्यात या महामार्गाची अवस्था अजून दयनीय झाली आहे. याबाबत सध्या कोकणातील एका तरूणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तरूणाने कोकणातील राजकारणी यांच्यावर रोष काढत मार्गाची अवस्था कथन केली आहे.

काय आहे व्हिडिओ?

लांजा आणि राजापूर येथील मार्गावरून तरूणाने हा व्हिडिओ चित्रित केला आहे. तरूणाने व्हिडिओमधून रस्ता दाखवत हा रस्ता वाहन चालवण्याच्या लायकीचा आहे का? असा प्रश्न त्याने राजापूरच्या बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांना केला आहे.

खड्डे, माती आणि पाणी यामुळे दयनीय अवस्था झालेल्या मार्गावरून वाहन चालवायचे कसे, तसेच रात्रीच्या वेळेस मार्गावर वाहन अडकून पडल्याचे ते बाहेर कसे काढायचे? गेल्या दहा - बारा वर्षांपासून एक लायकीचा रस्ता बनवता आला नाही, याची लाज वाटली पाहिजे.

लोकांना कोकणात यायचे असेल तर लोक कोल्हापूर मार्गे येत आहेत. राष्ट्रीय महामार्ग म्हटला जाणारा हा रस्ता पायवाट पण शोभत नाही. आणि कोकणातील आमदार, खासदार या महामार्गावर टोलनाके मुलांना कसे मिळतील यासाठी योजना आखत आहेत.

कोकणी मानसाला हात जोडून विनंती आहे आत्तातरी तुमच्या हक्कांसाठी जागे व्हा. असे या तरूणाने विनंती केली आहे. सत्ताधाऱ्यांनी जशी मुंबई पाण्यात घातली त्याच पद्धतीने कोकण पाण्यात घालतोहेत. कोकणातील लोकांना घरांना टाळे ठोकून मुंबईत जावे लागते त्याला हे राजकारणी कारणीभूत आहेत. आजही वेळ गेली नाही एकत्र या नाहीतर अजून दहा वर्षे हा महामार्ग होणार नाही असे या तरूणाने व्हिडिओत म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

खरी कुजबुज: सरकारची अशीही हुशारी!

दणका! वेर्णात वृक्षतोडीला स्थगिती, उच्च न्यायालयाचा निर्णय; तज्ज्ञ समितीकडून पाहणी

Karapur Mega Project Protest: आंदोलकांना पणजीत रोखले; गुन्हे न नोंदविताच सोडले, मेगा प्रकल्पाविरोधात कारापूरवासी एकवटले

SCROLL FOR NEXT