Mumbai Goa Indigo Flight  Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Flight: खराब हवामानाचा इंडिगोच्या फ्लाईटला फटका, मुंबईला उड्डाण केलेले विमान 'मोपा'वर परतले

खराब हवामानामुळे विमान काही काळ हवेत घिरट्या घालत राहिले आणि नंतर मोपावर परतले.

Pramod Yadav

Mumbai Goa Flight: गोव्यातून मुंबईला निघालेल्या फ्लाईटला खराब हवामानाचा फटका बसला. शुक्रवारी (दि.08) दुपारी इंडिगोच्या विमानाने गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईच्या दिशेने उड्डाण घेतले, पण मुंबईतील खराब हवामानामुळे विमान काही काळ हवेत घिरट्या घालत राहिले आणि नंतर मोपावर परतले.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने उत्तर गोवा, मोपा येथील मनोहर विमानतळावरून मुंबईकडे जाण्यासाठी दुपारी 1.16 वाजता उड्डाण केले. पण, मुंबईतील खराब हवामानामुळे विमानाला लॅंडिंग करता आले नाही.

लॅंडिंगची सूचना मिळेपर्यंत विमान काही काळासाठी हवेतच घिरट्या घालत राहिले. अखेर विमान पुन्हा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर परतले. यामुळे विमानातील प्रवाशी देखील कंटाळले तसेच, त्यांना अतिरिक्त वेळ खर्च करावा लागला.

हवामान स्वच्छ झाल्याची खात्री केल्यानंतर सायंकाळी चार वाजता पुन्हा हे विमान मुंबईच्या दिशेने झेपावले आणि सुरक्षित लँड झाले.

दरम्यान, या विलंबामुळे विमानातील प्रवाशांना देखील नाहक त्रास सहन करावा लागला. खराब हवामानामुळे तब्बल दीड तास प्रवाशांना या विमानात बसावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT