Traffic Jam On Mumbai Goa Highway Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, सुट्ट्यांमुळे कोकणात जाण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Mumbai Goa Highway Traffic: कोंडीतून बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करतायेत पण, या पर्यायी मार्गावर देखील कोंडी पाहायला मिळत आहे.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway Traffic

माणगाव: नाताळ आणि नववर्षाच्या सलग सुट्ट्यांमुळे अनेक पर्यटक गोवा आणि कोकणात जात आहेत. दरम्यान, मुंबई - गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी पाहायला मिळत असून, इंदापूर आणि माणगाव भागात वाहतूक कोंडी झाली आहे. कोंडीतून बाहेर पडण्यासाठी काहीजण पर्यायी मार्गाचा वापर करत आहेत. दरम्यान, पर्यायी मार्गावर देखील कोंडी झाल्याचे दिसत आहे.

नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजणांना गोवा आणि कोकणात जाण्यासाठी नियोजन केले. पण, या नियोजनाला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कोकणाच्या दिशेने जाणारी अनेक वाहने मुंबई - गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव येथे अडकून पडली आहे. गेल्या तीन ते चार तासांपासून वाहने वाहतूक कोंडीत अडकून पडली आहेत. अनेकजण कोंडीतून बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करतायेत पण, या पर्यायी मार्गावर देखील कोंडी पाहायला मिळत आहे.

वाहतूक पोलिस कोंडी फोडण्याचा प्रयत्न करतायेत पण, वाहनांच्या मोठ्या रांगा असल्याने गती मंदावली आहे. सलग सुट्टयांमुळे अनेकांनी गोवा, कोकणात फिरण्याचा प्लॅन केलाय. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक मुंबई गोवा महामार्गाने कोकण व गोव्यात जाण्यासाठी निघाली आहेत. दरम्यान, महामार्गावरील प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामान करावा लागत आहे.

गोवा, कोकणात पर्यटन फुल्ल

डिसेंबर अखेर असल्याने गोवा आणि कोकणात पर्यटन हंगाम फुल्ल सुरु आहे. देशी विदेशी पर्यटक गोव्यासह कोकणाल पसंती देत असून, या भागात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गोव्यात नाताळ, सनबर्न, थर्टी फर्स्टचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गोव्यात येत आहेत. तर, कोकणात सुंदर समुद्रकिनारे, कोकणातला निसर्ग आणि निवांतपणा अनुभवण्यासाठी पसंती देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lanka Vesak Festival Accident: श्रीलंकेत बौद्ध उत्सवादरम्यान भीषण अपघात, मद्यधुंद पिकअप चालकानं गर्दीला चिरडलं; 6 भाविकांचा मृत्यू तर 13 गंभीर जखमी

Bicholim Sports Ground: मोडलेली फाटके अन् कोसळणारे खांब! डिचोलीच्या ऐतिहासिक मैदानाचा खेळखंडोबा; खेळाडू धोक्यात

Gajlakshm Rajyog 2026: कुबेराचा खजिना रिता होणार, रातोरात चमकणार भाग्य! 'गजलक्ष्मी योग' 4 राशींना बनवणार करोडपती; गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम काळ

दक्षिणेतील मोर्चेबांधणी आणि काँग्रेसपुढील आव्हाने

Goa Monsoon: पावसाळापूर्व तयारी केवळ बैठकांपुरतीच

SCROLL FOR NEXT