Kashedi Ghat Tunnel 
गोवा

Mumbai Goa Highway: कोकणात येणाऱ्यांसाठी खुशखबर! कशेडी बोगद्यातील सिंगल लेन सुरू, 10 मिनिटात पूर्ण होणार प्रवास

एका लेनमधून हलक्या वाहनांना सोडलं जाणार असल्याने, कशेडी घाटातील वाहतूक बऱ्यापैकी सुरळीत होणार आहे.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवानिमित्ताने कोकण प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदा आजपासून (दि.11) वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सिंधुर्दुगकडे जाणारी एक लेन आज वाहतुकीसाठी खुली केली आहे.

यामुळे नागमोडी कशेडी घाटात (Kashedi Ghat Tunnel) होण्याऱ्या वाहतूककोंडीला ब्रेक लागणार आहे. या एका लेनमधून हलक्या वाहनांना सोडलं जाणार असल्याने, कशेडी घाटातील वाहतूक बऱ्यापैकी सुरळीत होणार आहे. राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली आहे.

'गणेशोत्सवापूर्वी आपल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या महत्त्वाच्या टप्प्यांचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार कशेडी बोगद्यातील सिंगल लेनची वाहतूक आता सुरू करण्यात आली आहे. कशेडी ते पोलादपूर हा प्रवास अवघ्या 10 मिनिटात पार करता येईल आणि प्रवाशांचा बराच वेळ वाचेल.'

'यंदा कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनाही निश्चितच हा बोगदा सुरू झाल्यामुळे फायदा होईल. उर्वरित कामदेखील लवकरच पूर्ण करून संपूर्ण मुंबई - गोवा महामार्ग प्रवाशांसाठी उपलब्ध होईल, असं आश्वासन देतो.' असे ट्विट मंत्री चव्हाण यांनी केले आहे.

कोकण म्हटलं की सर्वांनाच वळणावळणाचे नागमोडी रस्ते आठवतात, पण हे रस्ते वाहतुकीत अडथळे निर्माण करतात. त्यामुळे सरळ रस्ता उभारण्याच्या दृष्टिकोनातून पोलादपूरमधील भोगाव ते रत्नागिरीतील कशेडी पर्यंत टनेल उभारण्यात आले आहे.

या टनेलमुळे पूर्वी जे अंतर गाठायला 1 तास लागायचा, तेच अंतर आता अवघ्या 10 मिनिटांत गाठता येणार आहे. यामुळे प्रवाशांची 45 मिनिटे वाचतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT