Nitin Gadkari Dainik Gomantak
गोवा

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण डिसेंबरपर्यंत होणार पूर्ण; गडकरींची ग्वाही

भुमीपुजनाच्या वेळी वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण येत्या डिंसेबरपर्यंत पुर्ण होईल असे आश्वासन दिले आहे.

दैनिक गोमन्तक

Mumbai-Goa Highway: वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण येत्या डिंसेबरपर्यंत पुर्ण होईल असे आश्वासन दिले आहे. मुंबई व विशेषत्वाने कोकणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पळस्पे ते इंदापूर महामार्गातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा भूमिपूजन सोहळा दरम्यान त्यांनी ही माहिती दिली.

मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 हा कोकणातील प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणारा महामार्ग आहे. यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळेल.

प्रमुख औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा हा मार्ग असल्याने औद्योगिक विकासालाही चालना मिळेल. तसेच कृषी, फलोत्पादन वाहतूक सुलभ होऊन व्यवसायाला चालना मिळेल.

सुधारित रस्ता सुरक्षा प्रणालीमुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल. हे प्रकल्प जिल्ह्याच्या, राज्याच्याच नाही तर देशाच्या व्यापारवृद्धीत व सर्वसमावेशक प्रगतीमध्ये महत्त्वाचा वाटा उचलतील.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज 15 हजार कोटी रुपयांच्या नवीन तीन प्रकल्पांची घोषणा त्यांनी केली. यामध्ये कळंबोली जंक्शन हा 1200 कोटी रुपयांचा प्रकल्प, पागोडे जंक्शन चौक ते ग्रीनफील्ड महामार्ग हा 1200 कोटी रुपयांचा प्रकल्प आणि मोर्बे – करंजाडे हा जेएनपीटीवरून जाणारा 13000 कोटी रुपयांचा दिल्लीला जोडणारा महामार्ग यांचा समावेश आहे. या प्रकल्पांच्या कामांना लवकरच सुरुवात होईल असे ते म्हणाले.

दरम्यान, मुबंई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी चिपळूण, रत्नागिरी येथील मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट विभाग 27 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान दररोज सहा तास बंद राहणार आहे. मुंबई-गोवा महामार्ग हा आपल्या देशातील रखडलेल्या प्रकल्पांपैकी एक आहे. मागील अनेक वर्षांपासून याचे काम पूर्ण झालेले नाही.

परशुराम घाट विभागाची लांबी सुमारे 5.40 किमी आहे. आतापर्यंत 4.20 किमी महामार्गाचे काँक्रिटीकरण करण्यात आले असून, हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, परशुराम घाटाच्या उर्वरित 1.20 किमी लांबीचे काम अजून अपूर्णच आहे. डोंगराळ भागामुळे त्या भागाचे काम थोडे आव्हानात्मक आहे.

काही वेळा या भागात अवकाळी पावसात भूस्खलनाच्या घटना घडतात. रस्त्याच्या कामात डोंगराच्या 25 मीटरपर्यंत खोदकाम केले जाईल. खोदकाम सुरू असताना महामार्गावर दगड आणि माती पडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात येणार आहे. महामार्गाचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून राज्य PWD-राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत राबविण्यात येत आहे. महामार्ग बंद करण्यासाठी ठेकेदाराने अधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

Goa Tourism: पर्यटन हंगामात यंदा दाबोळीत 144 चार्टर्ड विमाने! 26 हजार परदेशी पर्यटक येणार, विमानतळ प्रशासनाची माहिती

SCROLL FOR NEXT