Yuri Alemao Reacts on Mumbai Crosses Vandalism Dainik Gomantak
गोवा

Mumbai Crosses Vandalised : पुन्हा एका क्रॉसची तोडफोड; युरी आलेमाव यांची दोषींवर कठोर कारवाईची विनंती

मुंबईतील माहीम येथील सेंट मायकल चर्चमधील स्मशानभूमीत बांधलेल्या अनेक वास्तू आणि क्रॉसची शनिवारी तोडफोड करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

मुंबईतील माहीम येथील सेंट मायकल चर्चमधील स्मशानभूमीत बांधलेल्या अनेक वास्तू आणि क्रॉसची शनिवारी तोडफोड करण्यात आली. यामुळे मुळे कॅथलिक समुदायामध्ये खळबळ उडाली असून, मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुन्हेगारांचा शोध सुरू केला आहे. यासंदर्भात गोव्यातील विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. (Yuri Alemao Reacts on Mumbai Crosses Vandalism)

ते म्हणाले की, 7 जानेवारी 2023 रोजी सेंट मायकल चर्च स्मशानभूमी, माहीम येथे काही बदमाशांनी 18 क्रॉसची तोडफोड केल्याने धक्का बसला. गोवा आणि मुंबई यांचे भावनिक नाते आहे. मुंबईतील काही क्रॉस हे गोव्याचे आहेत. त्यामुळे संबंधितांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे मी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून दोषींवर कठोर कारवाई करण्याची विनंती करतो.

चर्चने या संदर्भात अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची विनंती केली आहे. 'सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या विधानाच्या आधारे संबंधित व्यक्तीला अटक करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.

या घटनेने राजकीय नेत्यांचे लक्ष वेधून घेतले असून "कॅथलिक समुदायाला त्रास देणे" या हेतूने केलेल्या कृत्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.

देशभरात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. यामुळे संबंधित लोकांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT