Mulgao Mineral Transport Dainik Gomantak
गोवा

Mulgao: मुळगाव खाणीची होणार संयुक्त पाहणी! डिचोली उपजिल्हाधिकाऱ्यांकडून नोटीस जारी

Mulgao Mining: ‘वेदांता’चे अधिकारी तसेच पंचायत मंडळासह मुळगावमधील विविध ग्रामसंस्थांच्या प्रतिनिधींसोबत ही पाहणी होणार आहे.

Sameer Panditrao

Mulgao Mineral Transport Inspection

डिचोली: सध्या बंद असलेल्या मुळगावमधील खाणीची उद्या (शुक्रवारी) संयुक्त पाहणी होणार आहे. उद्या दुपारी ३ वाजता ही पाहणी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ‘वेदांता’चे अधिकारी तसेच पंचायत मंडळासह मुळगावमधील विविध ग्रामसंस्थांच्या प्रतिनिधींसोबत ही पाहणी होणार आहे.

खाण आणि भूगर्भ खात्यासह अन्य सरकारी खात्यांचे अधिकारी या पाहणीवेळी उपस्थित राहणार आहेत. तशी नोटीस डिचोलीचे उपजिल्हाधिकारी भिमनाथ खोर्जुवेकर यांनी संबंधितांना जारी केली आहे. मुळगावमधील खनिजप्रश्नी गेल्या सोमवारी डिचोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्त्वाची बैठक झाली होती.

नवनियुक्त उपजिल्हाधिकारी बी. खोर्जुवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या त्या बैठकीत खनिजसंदर्भात चर्चा झाली. मुळगावच्या प्रतिनिधींनी आपले म्हणणे अधिकाऱ्यांसमोर मांडले होते. खाणीची संयुक्त पाहणी करण्याचा निर्णय त्या बैठकीत झाला होता.

मुळगावची खाण बंद

खनिज व्यवसायाला आमचा विरोध नाही, अगोदर गावचे प्रश्न जाग्यावर घाला. नंतरच खाणीचा विचार करा, अशी मुळगावच्या लोकांची मागणी आहे. मुळगावमधील मंदिरांसह घरेदारे, शेती-बागायती, तळी आणि अन्य नैसर्गिक जलसंपदा खाण लीज क्षेत्रातून बाहेर काढा. नैसर्गिक वैभव जपताना गावचे अस्तित्व सांभाळा. शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवा. रोजगारात स्थानिकांना प्राधान्य द्या आदी मुळगाववासीयांच्या प्रमुख मागण्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Legends Pro T20: क्रिकेटचे 'लीजंड्स' गोव्यात! 6 संघ, 10 दिवस अन् वेर्णाच्या मैदानावर रंगणार टी-20चा थरार

Army Vehicle Accident: जम्मू-काश्मीरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात; 10 जवान शहीद VIDEO

शिक्षकच आपल्या मुलांना खाजगी शाळेत घालतात तेव्हा... सरकारी शाळांच्या विश्वासार्हतेचे काय?

Crime News: बायकोची हत्या करुन मृतदेह पंख्याला टांगला, प्रेमविवाहाचा 'रक्तरंजित' शेवट; मित्राच्या मदतीनं नवऱ्यानं काढला काटा

बिहारचा बाहुबली ते दिल्लीचा दरबारी; नितीन नवीन यांच्या संघटनात्मक कौशल्याची आता राष्ट्रीय कसोटी- संपादकीय

SCROLL FOR NEXT