Mud on Cortalim Road  Dainik Gomantak
गोवा

कुठ्ठाळी संत्रात येथे रस्त्यावर माती आल्याने अपघाताची भीती

बिल्डकॉन कंपनीकडून रस्त्यावर पसरलेली माती हटवली

दैनिक गोमन्तक

कुठ्ठाळी : कुठ्ठाळी संत्रात येथील राष्ट्रीय महामार्गावरील उतरणीवर मातीचा भराव वाहून आल्याने वाहन चालकांना गैरसोय झाली.या गोष्टीची कुठठाळीचे आमदार आंतोन वाझ यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील परिस्थितीचा अंदाज घेऊन दिलीप बिल्डकॉन कंपनीकडून रस्त्यावर पसरलेली माती हटवली व वाहतुकीस रस्ता सुरळीत केला.

याबाबत कुठठाळीचे आमदार आंतोन वाझ यांना विचारले असता ते म्हणाले, की मिळालेल्या माहितीनुसार येथे विशेषतः रात्री किरकोळ प्रकारचे अपघात होऊन काहीजण जखमी झाले आहेत. तसेच पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहात डोंगर माथ्यावरून माती वाहून आली होती.

सध्या कुठठाळी येथील झुआरी पुलाच्या उड्डाण पुलाचे काम चालू असून तिथेच बगल मार्गासाठी डोंगर कापण्यात आला आहे. याच ठिकाणीच येथील स्थानिक स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आहे. हे काम करत असताना या रस्त्याची काटछाट करण्यात आली होती. हीच माती रस्त्यावर येऊन पसरली होती. सध्या केवळ एकाच दिवसात पडलेल्या पावसात ही स्थिती तर मग संपूर्ण पावसाळ्यात काय अवस्था होईल, असा सवाल स्थानिकांतून विचारला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

Sheikh Hasina Press Conference: 'मी जेल आणि मृत्यूला घाबरत नाही!', शेख हसीना यांचा मायदेशी परतण्याचा थेट इशारा; भारतातील पत्रकार परिषदेने उडवली खळबळ

Goa Politics: 'आरजी'कडून निलंबित खोलकरांना चौकशीसाठी नोटीस; 7 ऑगस्‍टला हजर राहण्‍याचे निर्देश

Accident Death: भीषण अपघात! माशेल येथे जीपची दुचाकीला जोरदार धडक; सावंतवाडीतील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Goa Apostille Process: परदेशात जाणाऱ्या गोवेकरांसाठी खूशखबर! कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया झाली सुलभ; सरकारकडून 'SOP' जाहीर

SCROLL FOR NEXT