Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

Viriato Fernandes: मुख्यमंत्री, पंतप्रधानांचे 'शेतकऱ्यांकडे' दुर्लक्ष! 'गोव्यातील' समस्यांबाबत पुढाकार घेणार असल्याचे विरियातोंचे आश्वासन

Magao Farmers: मडगाव कोकण रेल्वेस्‍थानकासमोर असलेल्‍या शेतजमिनींच्‍या मालकांशी अर्थात शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर फर्नांडिस पत्रकारांशी बोलत होते. शेतकरी क्लावडियस डायस यांनी खासदारांना एक निवेदन सादर केले. त्यात शेतजमीन परत शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्याची त्यात मागणी करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: आज शेतकऱ्यांचे प्रश्‍‍न आणि समस्या अधांतरी आहेत. त्‍या सोडविण्याचा कोणीच प्रयत्न करत नाही. मात्र गोव्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्‍यासाठी आता मी पुढाकार घेणार असून, त्‍या केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्‍यासमोर ठेवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही याबाबत निवेदन देणार आहे. शिवाय लोकसभेत आवाज उठवणार आहे, असे दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले.

मडगाव कोकण रेल्वेस्‍थानकासमोर असलेल्‍या शेतजमिनींच्‍या मालकांशी अर्थात शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर फर्नांडिस पत्रकारांशी बोलत होते. शेतकरी क्लावडियस डायस यांनी खासदारांना एक निवेदन सादर केले. त्यात शेतजमीन परत शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्याची त्यात मागणी करण्यात आली आहे. यावेळी सावियो कुतिन्हो व शेतकऱ्यांची उपस्‍थिती होती.

कृषीउत्पादनाच्या वाढीसाठी जास्तीत जास्त शेतजमीन लागवडीखाली आणणे गरजेचे आहे. मात्र येथे उलटी प्रक्रिया होत आहे. गोव्यातील शेतजमिनी मेगा प्रकल्पांसाठी संपादन केल्या जात आहेत. मुख्यमंत्री ‘स्वयंपूर्ण गोवा’ तर पंतप्रधान ‘आत्मनिर्भर भारत’ याबाबतच्या गोष्टी करतात. मात्र शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतात, असा आरोपही खासदार फर्नांडिस यांनी केला.

कृषीउत्पादन वाढविण्यासाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. त्यांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. जिल्हा ग्रामीण विकास मंडळाच्या अध्यक्षपदी असल्‍याने सरकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा मी प्रयत्न करणार आहे, असे खासदार फर्नांडिस यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना शेती करण्‍यास सरकारकडूनच आडकाठी!

मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्यावरही खासदार विरियातो फर्नांडिस यांनी टीका केली. ते म्‍हणाले की, २००४ साली मडगाव कोकण रेल्वेस्‍थानकासमोरील जागा बसस्थानकासाठी संपादित केली होती. नंतर २००९ साली परप्रांतीयांचे पुनर्वसन करण्यासाठी शेतकऱ्यांना नोटिसा पाठविण्यात आल्‍या. त्‍यानंतर या जागेत कचरा टाकण्याचा प्रयत्न झाला. आता ही जागा सरकारच्या ताब्यात असून शेतकऱ्यांना शेती करण्‍यासाठीही सरकारच्या दबावाला सामोरे जावे लागते. ही शेतजमीन परत शेतकऱ्यांच्या नावावर करून त्‍यांच्‍या ताब्यात द्यावी, अशी मागणी त्‍यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT