हळदोणे येथे शोकसभा आयोजित करण्यात आली होती.  Dainik Gomantak
गोवा

Murder Case: तरूणीच्या कुटुंबियांसह हळदोण्यात हजारो लोक रस्त्यावर

‘आप’चे राहुल म्हांबरे यांच्यासह हजारो लोक उपस्थित होते. ‘तरूणीला न्याय द्या’, ‘महिलांविरोधातील हिंसाचार बंद करा’ अशा आशयाचे फलक होते.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: 19 वर्षीय तरूणीच्या मृत्युप्रकरणाचा लवकरात लवकर तपास लागावा आणि दोषींवर त्वरित कारवाई व्हावी, या मागणीसाठी हळदोणे येथे शोकसभा आयोजित करण्यात आली होती. बाजारपेठ परिसरात शांततापूर्ण मार्गाने मेणबत्ती मिरवणूक काढण्यात आली. याप्रकरणी योग्य चौकशी केली नाही, तर कळंगुट पोलिस स्थानक व पणजी येथील पोलिस मुख्यालयावर मोर्चा नेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. हळदोणे व नास्नोळा येथील नागरिकांनी तरूणीच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत या शोकसभेचे आयोजन केले होते.

महिला चळवळीतील कार्यकर्त्या साबिना मार्टिन्स, ऐश्वर्या साळगावकर, माजी आमदार किरण कांदोळकर, काँग्रेसचे कळंगुट येथील नेते राजेंद्र कोरगावकर, ‘आप’चे राहुल म्हांबरे यांच्यासह हजारो लोक उपस्थित होते. ‘तरूणीला न्याय द्या’, ‘महिलांविरोधातील हिंसाचार बंद करा’ अशा आशयाचे फलक होते.

नास्नोळा पंचायतीचा ठराव

या तरूणीच्या मृत्युप्रकरणी पोलिस व शासकीय अन्य यंत्रणांच्या माध्यमातून सखोल चौकशी व्हावी व या युवतीच्‍या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संबंधितांना निर्देश द्यावेत, असा मागणीवजा ठराव नास्नोळा पंचायतीने संमत केला आहे. या विषयावर पंचायतीच्यावतीने अद्याप मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला निवेदन दिले नाही अथवा फोनवरही संपर्क साधला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तपास योग्य दिशेने : मुख्यमंत्री

या प्रकरणाचा तपास उत्तर जिल्हा पोलिस व क्राईम ब्रँच पोलिस समानरित्या व्यवस्थितपणे व योग्य दिशेने सुरू आहे. हा तपास अजून बंद केलेला नसून त्यात काही संशयास्पद आढळून आल्यास त्याचीही पडताळणी केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथील एका कार्यक्रमानंतर दिली.

"सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज व तरूणीचा मोबाईल यांच्या आधारे तपासकाम वेळीच करणे आवश्यक होते. पण, त्या माध्यमाचा वापर सरकारने का केला नाही, याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी जाब विचारावाच लागेल."

- राहुल म्हांबरे, आप

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT