Candolim Goa Murder Case Dainik Gomantak
गोवा

माता न तूं वैरिणी! गोव्यात हॉटेलमध्ये केला 4 वर्षीय बाळाचा खून, मृतदेह बॅगेत भरुन आई पसार

महिलेने सिकेरी येथील एका हॉटेलमध्ये बाळाचा खून केला आणि मृतदेह बॅगेत भरुन ती पसार झाली.

Pramod Yadav

Sinquerim Candolim: गोव्यातील सिकेरी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने पोटच्या चार वर्षीय बाळाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

महिलेने सिकेरी येथील एका हॉटेलमध्ये बाळाचा खून केला आणि मृतदेह बॅगेत भरुन ती पसार झाली. दरम्यान, चित्रदुर्ग येथे संशयित महिलेला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिकेरी येथील एका हॉटेलमध्ये महिलेने पोटच्या बाळाचा खून केला आणि मृतदेह बॅगेत भरुन टॅक्सीने फरार झाली. हॉटेलचा रुमबॉय जेव्हा महिलेने बुक केलेल्या खोलीत गेला तेव्हा रक्त पाहून पोलिसांनी कल्पना दिली.

कळंगुट पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपास चक्र फिरवली आणि टॅक्सी चालकाचा मार्ग शोधून काढला.

महिला चित्रदुर्ग येथे पसार झाल्याचे समजताच कळंगुट पोलिसांनी तेथील स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. समोर आलेल्या माहितीनुसार चित्रदुर्ग येथे संशयित महिलेला अटक करण्यात आली असून, गोवा पोलिसांचे पथक महिलेला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

Goa Mining: 'ईएसझेड'च्या निर्बंधांमुळे दक्षिण गोव्यातील डंप लिलावास प्राधान्य; 14 जुलै रोजी आणखी 6 डंप लिलावात

SCROLL FOR NEXT