Curchorem Market Complex Dainik Gomantak
गोवा

Curchorem News: कुडचडे पालिका बाजार प्रकल्पाइथे डासांचे थैमान!

Curchorem Market Complex: पालिका बाजार प्रकल्पाचे काम गेली दोन वर्षे रखडले; होडारकर यांची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

कुडचडे येथील पालिका बाजार प्रकल्पाचे काम गेली दोन वर्षे रखडले असून अर्धवट बांधकाम झालेल्या या प्रकल्पात सध्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने डासांची पैदास होऊन रोगराई पसरणार असल्याचे नगरसेवक बाळकृष्ण होडारकर यांनी कुडचडे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

पालिका बाजाराची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. याठिकाणी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले, असे होडारकर यांनी सांगितले.

हा प्रकल्प वेळेत पूर्ण न करणे तसेच सुरक्षेसाठी कोणतीच उपाययोजना आखली गेली नसल्याने येथे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. त्यामुळे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी होडारकर यांनी केली.

या प्रकल्पात पूर्वीच्या व्यावसायिकांना त्यांची दुकाने परत लवकर मिळवून दिल्यास त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे होडारकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT