Vijai Sardesai at Mormugao Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: मुरगावातील जनतेला लोटले कोळसा प्रदूषणाच्या खाईत!

Mormugao News: वास्को येथे जनता दरबार मध्‍ये लोकांच्‍या समस्‍या जाणून घेतल्‍यानंतर सरदेसाई यांचा सरकारवर निशाणा

गोमन्तक डिजिटल टीम

मुरगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी येथील जनतेला कोळसा प्रदूषणाच्या खाईत लोटले आहे. मुरगाव पतन प्राधिकरण (एमपीए) जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करत आहे. या भागात भाजप म्‍हणजे ‘भारतीय गॅम्बलिंग पार्टी’ बनल्याची टीका गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी केली.

वास्को येथे आयोजित ‘जनता दरबार’मध्‍ये लोकांच्‍या समस्‍या जाणून घेतल्‍यानंतर सरदेसाई यांनी सरकारवर निशाणा साधला. स्‍थानिक आमदार कोळसा प्रदूषणावर न बोलता फक्त हप्ता वसुली कशी करता येईल यावर अधिक भर देत आहे.

खारीवाडा-वास्को येथील मच्छीमार जेटीची अवस्था बिकट झाली आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात मुरगाव तालुक्यातील सर्व समस्यांवर प्रश्‍‍न उपस्थित करणार आहे, असे ते म्‍हणाले.

दरम्‍यान, वास्को येथील ‘झेड स्क्वेर’ सभागृहात आयोजित या ‘जनता दरबार’मध्‍ये चारही तालुक्यांतील जनतेने आपल्या समस्या मांडल्या. यावेळी गोवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा माजी महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा, गोवा फॉरवर्डचे पदाधिकारी दुर्गादास कामत, चिखलीचे माजी सरपंच सॅबी परेरा, माजी सरपंच राहुल डिकॉस्‍टा व पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT