Port Barge Inccident Dainik Gomantak
गोवा

Vasco: मुरगाव बंदरामध्ये बार्जला जलसमाधी, आठजण बचावले; जहाजाच्या अवशेषांना धडकून अपघात

Mormugao Port Barge Inccident: मुरगाव पोर्ट प्राधिकरणाच्या (एमपीए) हद्दीत दोन दिवसांपूर्वी लोखंडी पेल्लेट्स वाहून नेणारी बार्ज बुडाली.

Sameer Amunekar

वास्को : मुरगाव पोर्ट प्राधिकरणाच्या (एमपीए) हद्दीत दोन दिवसांपूर्वी लोखंडी पेल्लेट्स वाहून नेणारी बार्ज बुडाली. सुदैवाने बार्जवरील आठही खलाशांना वाचविण्यात यश आले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही बार्ज बंदरात उभ्या असलेल्या जहाजाकडे लोखंडी पेल्लेट्स पोहोचविण्यास जात असताना यापूर्वी पाण्याखाली बुडालेल्या जहाजाच्या अवशेषाला ती धडकली. या धडकेमुळे बार्जच्या तळाला भेग पडली आणि त्यातून आतमध्ये भराभर पाणी शिरले. मात्र, खलाशांना तातडीने वाचविण्यात आले.

“यापूर्वीही याठिकाणी अनेक दुर्घटना घडल्या आहेत. नौका उलटल्या आहेत, तसेच बार्ज या अवशेषांवर धडकल्या आहेत. भविष्यातील अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.

मासेमारी नौकांसाठी डोकेदुखी

एमपीए हद्दीत पाण्याखाली जुन्या जहाजांचे अवशेष अजूनही असल्याने स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. काही वर्षांपूर्वी येथे दोन मोठी जहाजे बुडाली होती. त्यापैकी एका जहाजाचे अवशेष एमपीएने हटविले असले तरी दुसऱ्या जहाजाचे अवशेष अद्यापही तेथे आहेत.

हे अवशेष अनेक वर्षांपासून बार्ज, मासेमारी नौका व छोट्या बोटींसाठी अपघातासकारणीभूत ठरत आहेत,” असे सूत्रांनी नमूद केले. स्थानिकांनी या धोकादायक अवशेषांचे तातडीने निर्मूलन करण्याची मागणी केली आहे.

निवेदनाला केराची टोपली

याप्रकरणी गोवा बार्जमालक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत गवस म्हणाले, की अशा अपघातांमुळे बार्जमालकांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथे पाण्याखाली असलेले बोटी, ट्रॉलर्सचे अवशेष पूर्णत: बाहेर काढण्याची गरज आहे. यासंदर्भात एमपीएला निवेदन दिले आहे. सध्या बार्जचा व्यवसाय म्हणावा तसा होत नाही. त्यातच अशाप्रकारचे अपघात होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Modak Significance: गणरायाला का प्रिय आहे मोदक? काय सांगते पुराण? वाचा महत्व..

Ganesh Festival: बौद्ध-जैन धर्मीयांनाही मान्य असलेले दैवत, गणपतीबाप्पाचे सर्वधर्मीय आकर्षण

Opinion: पाकिस्तान, चीन भारताविरुद्ध नव्या कुरापतीची संधी शोधतायत, ट्रम्पने टॅरिफ वाढवलं; चिंता करायची की संधी शोधायची

Ravichandran Ashwin Retirement: क्रीडाविश्वात खळबळ! चेन्नईच्या 'या' स्टार खेळाडूची अचानक निवृत्तीची घोषणा

Ganesh History: 'चतुर्थीची कथा' महादेवांच्या रागातून शिरच्छेद, हत्तीमुखासह गणेश म्हणून झाला पुन्हा जीवंत

SCROLL FOR NEXT