Mormugao political quarrel Dainik Gomantak
गोवा

मुरगाव मतदार संघात राजकीय वातावरण तापले

मारहाण, तोडफोडप्रकरणी मुरगाव पोलीस स्थानकात 8 जणांविरुद्ध तक्रार

दैनिक गोमन्तक

वास्को : मुरगाव मतदार संघात राजकीय वातावरण तापले. उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वीच विरोधक एकमेकाशी भिडण्याचा प्रयत्न चालवला असून भाजपच्या स्क्रीनवरून प्रचार करणाऱ्या रिक्षा वाहन चालकास मारहाण, तसेच स्क्रीनची मोडतोड आणि रिक्षावरील भाजप नेत्यांच्या फोटोला काळे फासल्याप्रकरणी मुरगाव पोलीस स्थानकात आठ जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यापैकी उमेश मांजरेकर (वय 48) व मनोज मांजरेकर (वय 51) यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. (Goa Politics News Updates)

मुरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल रविवारी संध्याकाळी 6 वाजता हेडलँड सडा येथील प्रिंन्स बेकरीजवळ भाजपचा (BJP) प्रचार रिक्षातून एलसीडी स्क्रीनद्वारे चालू असताना तेथे शेखर दाभोलकर, सचिन भगत, राज हलवाई, अक्षय होन्नावरकर, शंकर पोळजी, उमेश मांजरेकर, जयेश शेटगावकर आणि मनोज मांद्रेकर यांनी रिक्षा जवळ येऊन रिक्षा चालक संतोष पडणकट्टी जो तक्रारदार आहे, त्याला सगळ्यांनी बेकायदेशीररित्या एकत्र येऊन शिवीगाळ केली. तसेच स्प्रे पेंटचा वापर करून एलसीडी स्क्रीन आणि रिक्षा वरील भाजप नेत्यांच्या बॅनरचे नुकसान करून मालमत्तेचे नुकसान केले. तसेच एका आरोपीने तक्रारदाराचा मोबाईल फोन फेकून दिला. याचे कारण त्याला विचारले असता सर्व आरोपींनी तक्रारदार आणि स्क्रीन ऑपरेटरला रोखून भाजपचा प्रचार (Election Campaign) केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली.

दरम्यान या विषयी तक्रार संतोष पडनकट्टी याने रात्री मुरगाव पोलीस (Police) स्थानकात आरोपी शेखर दाभोलकर, सचिन भगत, राज हलवाई, अक्षय होन्नावरकर, शंकर पोळजी, उमेश मांजरेकर, जयेश शेटगावकर आणि मनोज मांद्रेकर यांच्या या कृतीमुळे तक्रार दाखल केली. रात्री उशिरा उमेश मांद्रेकर व मनोज मांद्रेकर यांना अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

Shani Gochar 2026: 9 ऑक्टोबरपासून सुरु होणार 5 राशींचा सुवर्णकाळ! करिअर, व्यवसायात धनलाभाची संधी; मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT