Formula 4 Racing In Goa Dainik Gomantak
गोवा

Formula 4 Race Goa: ‘फॉर्म्युला-४ रेस’ चर्चेस दिला नकार! 9 नगरसेवक पडले बाहेर; मुरगाव पालिका मंडळाची बैठक तहकूब

Mormugao Municipal Council: नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली होती. नगरसेवकांनी फॉर्म्युला-४ हा जनतेशी निगडित विषय असल्याने तातडीने चर्चा घ्यावी, अशी मागणी केली.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: मुरगाव पालिका मंडळाच्या शुक्रवारच्या (ता. १०) विशेष बैठकीत फॉर्म्युला-४ रेस विषयावर चर्चा करण्यास नकार मिळाल्याने नऊ नगरसेवकांनी बैठकीतून उठून बाहेर पडले. परिणामी, बैठक तहकूब करण्यात आली.

नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली होती. नगरसेवकांनी फॉर्म्युला-४ हा जनतेशी निगडित विषय असल्याने तातडीने चर्चा घ्यावी, अशी मागणी केली. मात्र नगराध्यक्षांनी हा विषय ता. १३ रोजीच्या सर्वसाधारण बैठकीत चर्चेला घेणार असल्याचे सांगितले.

काही नगरसेवकांनी विरोध दर्शवत आवाज चढवला. फॉर्म्युला-४ साठी स्थानिक प्रशासनाची परवानगी न घेता रस्ते, गटारांची मोडतोड सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. ‘‘सामान्य नागरिक परवानगीशिवाय बांधकाम केले तर कारवाई होते; मग आयोजकांवर कारवाई का नाही?’’ असा सवाल नगरसेवक प्रजय मयेकर यांनी केला.

दामोदर नाईक यांनी सांगितले की, त्यांच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात माती टाकल्याने पावसात घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका आहे. त्यांनी कामे तात्काळ थांबवण्याची मागणी केली. नगराध्यक्षांनी चर्चा घेण्यास नकार दिल्याने रामचंद्र कामत, मंजूषा पिळणकर, दयानंद नाईक, दामोदर कासकर, दामोदर नाईक, प्रजय मयेकर, लिओ रॉड्रिग्ज, प्रिया राऊत आणि विनोद किनळेकर यांनी बैठकीतून बाहेर पडून बहिष्कार नोंदविला.

रामचंद्र कामत यांनी फॉर्म्युला-४ रेसमुळे नागरिकांना त्रास होणार असल्याने ती रेस इतरत्र घ्यावी, तसेच मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांनी चौकशी करावी, अशी मागणी केली. फॉर्म्युला-४ विषयावर चर्चा करण्यासाठी सर्वसाधारण बैठक १३ रोजी, तर तहकूब झालेली विशेष बैठक १५ रोजी घेण्यात येणार आहे.

नगरसेवकांचा आरोप आहे की फॉर्म्युला-४ रेससाठी स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही परवानगी न घेता बोगदा परिसरात कामे सुरू आहेत. रस्ते, गटारे तोडली जात असून नागरिकांना त्रास होत आहे. यावर नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी कारवाई करत नाहीत, अशी नाराजी व्यक्त करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT