Wade Lake, Dabolim  Dainik Gomantak
गोवा

Wade Lake: ..अखेर 'वाडे तळे' पुन्हा चर्च संस्थेच्या स्वाधीन! मंत्री गुदिन्हो यांच्या उपस्थितीत घेतला निर्णय

Mormugao Municipal Council: मुरगाव पालिकेने राज्य नगरविकास संस्थेमार्फत दाबोळी येथील वाडे तळ्याचे सुशोभीकरण केले होते. अखेर पालिकेने पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्या उपस्थितीत संपूर्ण वाडे तळे पुन्हा चर्च संस्थेच्या स्वाधीन करत असल्‍याचे सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Wade Lake in Dabolim Returned to Church Institution After Beautification

वास्को: मुरगाव पालिकेने राज्य नगरविकास संस्थेमार्फत दाबोळी येथील वाडे तळ्याचे सुशोभीकरण केले होते. अखेर पालिकेने पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्या उपस्थितीत संपूर्ण वाडे तळे पुन्हा चर्च संस्थेच्या स्वाधीन करत असल्‍याचे सांगितले. या तळ्याच्‍या दुसऱ्या टप्प्यातील काम लवकरच सुरू करणार असल्याचे गुदिन्हो यांनी सांगितले. परंतु गोवा शिपयार्डच्या नवीन प्रशासकीय इमारतीला ‘भोगवटा प्रमाणपत्र’ (ऑक्युपन्सी) नामंजूर केले.

गोवा शिपयार्डने इमारत बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, राष्ट्रीय मार्गापर्यंत असलेली संरक्षक भिंत पाडून काही मीटर आत घेणार, असे लेखी स्वरूपात आश्‍‍वासन दिले होते. मात्र, गोवा शिपयार्डने अजूनही संरक्षक भिंत मागे न घेतल्याने, त्यांना ‘भोगवटा प्रमाणपत्र’ देण्यास पालिका मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व उपस्थित नगरसेवकांनी तीव्र विरोध केला.

मुरगाव पालिकेच्‍या झालेल्या बैठकीत पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी खास उपस्थिती लावली. यावेळी पालिकेतील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

नगराध्यक्ष गिरीश बोरकर, मुख्याधिकारी दीपेश प्रियोळकर, उपनगराध्यक्ष रामचंद्र कामत, पालिका अभियंता मनोज आरसेकर, नगरसेवक दीपक नाईक, फेड्रिक हेन्रिक, यतीने कामुर्लेकर, विनोद किनळेकर, सुदेश भोसले, नगरसेविका प्रिया राऊत, शमी साळकर, श्रद्धा महाले, मथायस मोंतेरो, दामू नाईक, दामोदर कासकर, दयानंद नाईक, स्वामी, देविता आरोलकर, मंजूषा पिळर्णकर व इतर नगरसेवक बैठकीला उपस्थित होते

गोवा शिपयार्डसमोर मोठे संकट

गोवा शिपयार्डच्या नवीन प्रशासकीय इमारतीला ‘भोगवटा प्रमाणपत्र’ देण्यास उपस्थित सर्व नगरसेवकांनी तीव्र विरोध केला. यामुळे गोवा शिपयार्डसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या प्रमाणपत्राविषयी पुढील बैठकीत कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश कुमार उपाध्याय यांच्या उपस्थितीत चर्चा होईल, अशी माहिती पालिका बैठकीत देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT