Mormugao municipal council  Dainik Gomantak
गोवा

Mormugao Municipal Council: नवीन नगराध्यक्ष कोण? मुरगाव पालिकेत हालचाली सुरू

Mormugao Mayor: नगराध्यक्षपदासाठी काहीजणांनी आपली नावे पुढे केली आहेत; याप्रकरणी भाजपचे पदाधिकारी निर्णय घेतील

गोमन्तक डिजिटल टीम

Mormugao Mayor

वास्को: अलिखित करारानुसार मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांच्या नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याने नवीन नगराध्यक्षाच्या निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. नगराध्यक्षपदासाठी काहीजणांनी आपली नावे पुढे केली आहेत. तथापि, याप्रकरणी भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी निर्णय घेतील.

मुरगाव पालिका मंडळ अस्तित्वात आल्यावर दामू कासकर यांची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर अलिखित करारानुसार त्यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर नगरसेवक लिओ रॉड्रिग्ज यांची नगराध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली होती.

त्यानंतर १४ जुलै २०२३ रोजी नगरसेवक गिरीश बोरकर यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. दामू कासकर, लिओ रॉड्रिग्ज हे माजी मंत्री मिलिंद नाईक यांचे समर्थक, तर गिरीश बोरकर हे वास्कोचे आमदार दाजी साळकर यांचे खंदे समर्थक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway: रेल्वेत प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, सातजण जेरबंद; 60 मोबाईल जप्त

WhatsApp Username Feature: चर्चा पूर्ण होईपर्यंत यूजरनेम नाहीच, 'व्हॉट्सॲप'चे केंद्र सरकारला उत्तर, सायबर सुरक्षेचा दिला हवाला

शॉक लागून वीज कर्मचाऱ्याचा मृत्‍यू; फांद्या छाटताना 'कटर'चा विद्युतभारीत वाहिनीला स्‍पर्श, अस्‍नोड्यातील दुर्घटना

ED Raid: गोव्यासह भारत, 'यूएसए'मधील 112.90 कोटींची मालमत्ता जप्त; 'लील इलेक्ट्रिकल्स' मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीची कारवाई

Horoscope: शनिदेवाची विशेष कृपादृष्टी! शनिवार अनेक राशींसाठी भाग्यवर्धक; करिअर, शिक्षण आणि व्यवसायात मिळणार मोठा लाभ

SCROLL FOR NEXT