Election Dainik Gomantak
गोवा

ZP Election Morjim: ज्येष्ठ इच्छुकांचे पत्ते कट! 'मोरजी'त उमेदवार शोधण्‍यासाठी चढाओढ; महिला विरुद्ध महिला सामना रंगण्‍याची शक्‍यता

Goa Zilla Panchayat Election: मोरजी जिल्हा पंचायत मतदारसंघातही निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवार निवडीसाठी प्रमुख राजकीय पक्षांची धावपळ उडाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: मोरजी जिल्हा पंचायत मतदारसंघातही निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवार निवडीसाठी प्रमुख राजकीय पक्षांची धावपळ उडाली आहे. भाजप, काँग्रेस, आरजी, गोवा फॉरवर्ड, ‘आप’ या पक्षांनी विजयी होण्याची शक्यता असलेल्या उमेदवारांचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी बैठका घेणे सुरू केले आहे.

या निवडणुकीत पेडणे तालुक्यातील चार मतदारसंघांपैकी तीन राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी मोरजी ओबीसी महिलांसाठी, हरमल सर्वसाधारण महिलांसाठी, तोरसे ओबीसीसाठी तर धारगळ सर्वसाधारण मतदारसंघ म्हणून निश्चित करण्यात आला आहे.

मोरजी मतदारसंघातून यावेळी मगो-भाजप युतीमार्फत दोन नावांची चर्चा जोरात सुरू आहे व ती म्‍हणजे मांद्रेच्या माजी सरपंच तारा हडफडकर आणि तुयेच्या माजी सरपंच प्राजक्ता कान्नाईक यांची. या दोघींनीही आपापल्‍या पंचायत क्षेत्रात महिलांच्या गटांसाठी आणि सामाजिक विकासासाठी भरीव योगदान दिले आहे.

दरम्‍यान, मोरजी मतदारसंघ ओबीसी महिलांसाठी राखीव झाल्याने अनेक इच्छुकांच्‍या आशांवर पाणी फेरले आहे. त्‍यामुळे समीकरणे बदलली आहेत. अनेक ज्येष्ठ इच्छुकांचे पत्ते कट झाले आहेत.

तारा विरुद्ध प्राजक्ता सामन्‍याची चर्चा

सध्या या मतदारसंघात तारा हडफडकर आणि प्राजक्ता कान्नाईक यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे. तारा यांना मांद्रेचे आमदार जीत आरोलकर आणि त्यांच्या समर्थकांचा पूर्ण पाठिंबा मिळू शकतो. तर, प्राजक्ता या माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर आणि माजी आमदार दयानंद सोपटे यांच्या समर्थक मानल्या जातात.

या दोन्ही उमेदवारांना स्थानिक महिला गटांचा आणि स्वयंसाहाय्‍य संघटनांचा चांगला पाठिंबा आहे. दरम्‍यान, भाजप-मगो युतीची उमेदवारी शेवटी कुणाला मिळते, याकडे सध्या सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

तिन्‍ही शेटगावकर ‘आऊट’

गेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत सतीश शेटगावकर हे या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांच्या कार्यकाळात विकासकामांना गती मिळाली. तथापि, या वेळेस मतदारसंघ महिलांसाठी राखीव असल्‍यामुळे शेटगावकर निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर फेकले गेले आहेत.

तसेच सरकारने आरक्षण रचनेतून आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करून रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या आरक्षणामुळे काही इच्छुकांचे गणित कोलमडले आहे. उदा. माजी सरपंच वैशाली शेटगावकर, माजी उपसरपंच अमित शेटगावकर हे इच्छुक असले तरी त्यांना स्पर्धेतून बाहेर व्‍हावे लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Film Industry: कोकणी सिनेमा बनवायचा झाल्यास 'कोटी' रुपये गोव्यातील निर्माता कोठून आणेल?

IFFI Golden Peacock Award: कुणाला मिळणार 'गोल्डन पिकॉक' अवॉर्ड? उत्सुकता शिगेला..

Karapur Sarvona: ..आणि 'तो' मीटिंगमधून पळाला! कारापूर-सर्वण पंचायतीत गोंधळ; 2 महिला पंचसदस्‍यांना शिवीगाळामुळे गदारोळ

Goa Crime: सावत्र बाप निघाला 'नराधम'! 20 महिने अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ; दिली जीवे मारण्याची धमकी

Camurlim: ..परवाना नाही, तरीही झाडे तोडली! कामुर्ली ग्रामसभा तापली; सरपंचांचा FIRचा इशारा

SCROLL FOR NEXT