Service Road  Dainik Gomantak
गोवा

Service Road : सर्व्हिस रस्ते नीटनेटके करा! आर्लेकरांची सूचना

Service Road : राष्ट्रीय महामार्ग बनला धोकादायक

गोमन्तक डिजिटल टीम

Service Road : मोरजी, पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग-६६ हा दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे. या रस्त्यावर कसल्याच प्रकारचे दिशादर्शक फलक नाहीत. काही ठिकाणी रात्री अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.

त्यामुळे अनेक ठिकाणी अपघातही घडतात. काही रस्ते तर खचलेल्या स्थितीत दिसून येतात. पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी शुक्रवारी (ता. २९) मोपाचे सरपंच सुबोध महाले आणि एमव्हीआर कंपनीच्या अधिकारी यांच्यासोबत या रस्त्याची पाहणी केली. अगोदर गावागावांतील सर्व्हिस रस्ते नीटनेटके करण्याची सूचनाही त्यांनी केली.

यावेळी आर्लेकर म्हणाले की, तालुक्यातील रस्त्यांची स्थिती भयानक आहे. राष्ट्रीय महामार्ग तयार करताना अगोदर सर्विस रस्ते करणे गरजेचे होते. ते रस्ते व्यवस्थित केलेले नाहीत. त्याविषयी मी वेळोवेळी सरकारकडे पाठपुरावा केला तसेच अधिकाऱ्यांनाही भेटलो. आज या ठिकाणी पुन्हा पाहणी करताना अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

...अन्यथा महामार्ग रोखणार

सरपंच सुबोध महाले म्हणाले की, उगवे परिसरातील रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. येथे सर्व्हिस रस्त्यांचा पत्ताच नाही.

त्यामुळे जत्रोत्सवाच्या अगोदर हे रस्ते व्यवस्थित करावेत. अन्यथा आम्हाला राष्ट्रीय महामार्ग रोखावा लागेल, असाही इशारा त्यांनी दिला. यावेळी स्थानिक रहिवाशांनीही त्यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या.

खचलेल्या रस्त्याचे आठवडाभर लांबले काम

उगवे परिसरात जो रस्ता खचला होता, तो दुरुस्त करण्यासाठी अधिकाऱ्यांना आठ दिवसांपूर्वी सूचना केली होती. आज या परिसराची पाहणी केली असता, अद्याप काम सुरूच आहे.

त्याचप्रमाणे तांबोसे भागात जो रस्ता खड्डेमय बनला आहे, तो दुरुस्त करावा. तसेच कंत्राटदाराने हा रस्ता कधी सुरू होईल याची तारीख मला द्यावी, अशी मागणी केल्याचेही आर्लेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT