Party  Dainik Gomantak
गोवा

मोरजीवासीयांनी 'त्या' पार्टीच्या विरोधात आवाज उठवला

स्थानिकांनी आरोप केला की, कोणीतरी हॉटेल चालकाला पोलिस तक्रारीची माहिती दिल्यामुळे पोलिस हॉटेलमध्ये येण्यापूर्वीच संगीत बंद केले गेले.

दैनिक गोमन्तक

मोरजी: मोरजी येथील नागरिकांनी शनिवारी नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या पार्टीच्या विरोधात आवाज उठवला. ही पार्टी गावातील एका हॉटेलमध्ये सुरू होती. नागरिकांच्या माहितीनुसार, कोविड-19 (COVID-19) नियमांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात संगीत लावून पार्टी सुरू होती. (Morjim Goa Latest News)

या पार्टीबाबत स्थानिकांनी पोलिसांशी (Police) संपर्क साधला, मात्र पीआय विक्रम नाईक यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच संगीत आणि लाईट बंद करण्यात आली. स्थानिकांनी आरोप केला की, कोणीतरी हॉटेल चालकाला पोलिस तक्रारीची माहिती दिल्यामुळे पोलिस हॉटेलमध्ये येण्यापूर्वीच संगीत बंद केले गेले.

पार्टीत सहभागी होणाऱ्या लोकांकडे कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट आहे की नाही हे तपासण्याची कोणतीही तरतूद करण्यात आली नसल्याचेही यावेळेस समोर आले. एका स्थानिकाने सांगितले की, "गावात हॉटेलसाठी खाजगी पार्किंगची (Parking) जागा उपलब्ध नसल्यामुळे पर्यटक त्यांची वाहने रस्त्यावर पार्क करतात. परिणामी स्थानिक वाहन चालकांची गैरसोय होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT